यंदा पाऊस जास्त झाला, उन्हाळाही जास्त झाला आणि आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार थंडीही भरपूर पडणार आहे. त्यामुळे यंदा थंडीच्या दिवसात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. (Don't let your health deteriorate by getting cold, do 5 simple things and gain health in winter)त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करा. वेळीच काळजी घेतली की थंडीमुळे ताप येणे, खोकला होणे भरपूर सर्दी असे त्रास टाळता येतात. पाहा थंडी पळवून लावण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय.
थंडीच्या दिवसात अंग सुसतावते. हालचाल करायची इच्छा होत नाही. मात्र थंडी कमी करण्याचा सगळ्यात मस्त आणि सोपा उपाय म्हणजे हालचाल करणे. सकाळी साधा व्यायाम, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार किंवा काहीच नाही तर १५ ते २० मिनिटे जलद चालणे अशा कृती करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढवते आणि शरीर गरम राहते. जॉगिंग, स्किपिंग, स्पॉट मार्चिंग किंवा साधे घरकामही शरीराची उष्णता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. व्यायाम शक्य नसल्यास तळहात, पाय आणि कान या भागांचा मसाज केल्यानेही रक्ताभिसरण सुधारते आणि थंडी कमी होते. तळहात एकमेकांवर चोळून चेहर्याला लावायचे.
आहार हा दुसरा महत्त्वाचा भाग. तूप, गूळ, खजूर, मनुका, बदाम, अक्रोड, काजू, मेथी, तीळ, रताळं, बाजरी, ज्वारी असे पदार्थ आहारात असायला हवेत. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. लसूण रोज खा. लसूण सर्दी कमी करते तसेच खोकला होण्याचा धोकाही कमी करते. थंडीवरही छआन उपाय आहे.
अगदी सोप्या गोष्टी म्हणजे खिडक्या बंद ठेवणे, जाड पडदे लावायचे. हात मोजे वापरा. तसेच पायातही मोजे घाला. त्याचा खुप फायदा होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. त्यामुळे शरीराला जीवनसत्त्व डी मिळते. त्याबरोबर थंडीही कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीराला तेल लावायचे आणि मालीश करायचे. तेलामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. अंघोळ केल्यामुळेही थंडी कमी होते. त्यामुळे जर शरीराला झेपत असेल तर रात्री अंघोळ करायची. कामावरुन आल्यावर अंघोळ केल्यामुळे झोप फार छान लागते. तसेच थंडी बोचरी वाटत नाही आरामदायी आणि सुखकर वाटते.
