Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट टम्म फुगलेलं दिसतं? करा ‘हा’ उपाय, ब्लोटिंग होते कमी फक्त आठवडाभरात

पोट टम्म फुगलेलं दिसतं? करा ‘हा’ उपाय, ब्लोटिंग होते कमी फक्त आठवडाभरात

Does your stomach look round? No need for exercise, do 'this' remedy, bloating will reduce in just a week : हे उपाय करा म्हणजे पोटाचा फुगवटा कमी होईल. ब्लोटींगच्या समस्येवर उपयुक्त ठरतील या सवयी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 19:20 IST2025-06-25T18:42:32+5:302025-06-25T19:20:21+5:30

Does your stomach look round? No need for exercise, do 'this' remedy, bloating will reduce in just a week : हे उपाय करा म्हणजे पोटाचा फुगवटा कमी होईल. ब्लोटींगच्या समस्येवर उपयुक्त ठरतील या सवयी.

Does your stomach look round? No need for exercise, do 'this' remedy, bloating will reduce in just a week | पोट टम्म फुगलेलं दिसतं? करा ‘हा’ उपाय, ब्लोटिंग होते कमी फक्त आठवडाभरात

पोट टम्म फुगलेलं दिसतं? करा ‘हा’ उपाय, ब्लोटिंग होते कमी फक्त आठवडाभरात

पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यायाम, डाएट आदी करणे भाग आहे. त्याशिवाय वजन कमी होणार नाही. मात्र ज्यांचे वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटींगची समस्या असते. अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो. (Does your stomach look round? No need for exercise, do 'this' remedy, bloating will reduce in just a week)पोट फुगते आणि कपड्यांतूनही दिसून येते. काही वातूळ खाल्यावर तसेच तळलेले खाल्यावर ही समस्या उद्भवते. काहींना झोपेच्या कमतरतेमुळे ब्लोटींग होते. यावर उपाय करणे तसे सोपे आहे जाणून घ्या काय करायला हवे. सतत ब्लोटींग होत असेल तर ही समस्या कमी होण्यासाठी किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतोच. तेवढे दिवस काही नियम लक्षात ठेवा. आहारात काय घ्यावे काय नाही हे जाणून घ्या. त्यानुसार आहार घेतल्यावर ब्लोटींगची समस्या नक्कीच दूर होईल. 

१. दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात औषधी काही असेल तर ते पाणीच. पोट साफ झाल्यावर अडकलेली घाण निघून जाईल. त्यामुळे पोट छान साफ होईल. 

२. सगळ्यात आधी साखर आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. सतत गॅस होणाऱ्यांना सोडा प्यायची सवय असते. मात्र सारखा सोडा प्यायल्यामुळे ब्लोटींग होते. साखर आणि सोडा टाळायचा. 

३. आहारात आलं असायला हवे. आल्याचे पाणी प्यायवे. तसेच सब्जाचे पाणी रोज प्या. सब्जा पचन चांगले व्हावे यासाठी फायद्याचा आहे. पोटाला गारवा ही मिळतो. ब्लोटींगमुळे जर दुखत असेल तर त्रास कमी होते. 

४. चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा.  त्यामुळे ब्लोटींगची समस्या वाढते. पाव, ब्रेड असे बेकरी प्रॉडक्ट्सही खाऊ नका. पोटात जाऊन फुगणारे काहीही खाणे चांगले ठरणार नाही. त्यामुळे हे सगळे पदार्थ टाळणे फायद्याचे ठरेल. 

 ५. जिऱ्याचे पाणी, बडीशेपेचे पाणी पचनासाठी फार उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज न चुकता असे पाणी प्यायचे. ब्लोटींग झटपट कमी होईल. पोट साफ होईल आणि पोटाचा फुगलेला भाग लगेच कमी होईल. 

हे उपाय करुन जर फरक पडत नसेल तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊ या. पोट फुगण्यामागे इतरही कारणे असू शकतात.

Web Title: Does your stomach look round? No need for exercise, do 'this' remedy, bloating will reduce in just a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.