टाचेला एकदा का ठणका लागला की जीव नुसता वर खाली होत राहतो. कारण तो ठणका थांबता थांबत नाही. हाताने कितीही जोर दिला तरी, टाचेला काहीच जाणवत नाही. (Does your heel hurt? then you are wearing wrong slippers )चालताना त्रास होतोच पण बसल्यावरही टाच दुखत राहते. टाचदुखी मागे अनेक कारणे असू शकतात.
अति चालल्यामुळे टाच दुखते. बोटांपेक्षा टाचेवर जास्त भार आल्याने असे होते. (Does your heel hurt? then you are wearing wrong slippers )स्थुल लोकांची टाच सतत दुखते. कारण अशा लोकांचे वजन त्यांच्या टाचेला सहन होत नाही. टाचदुखीचे मुख्य कारण हे वजनच आहे. चालताना संपूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर असतो. बराच वेळ उभे राहिल्यावर टाचांवर जोर पडतो त्यामुळे त्या दुखायला लागतात. वजन कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
वजनही योग्य आहे आणि जास्त चालतही नाही, असे असूनही जर तुमची टाच दुखत असेल तर, त्यासाठी वेगळी कारणे असू शकतात. (Does your heel hurt? then you are wearing wrong slippers )पायाचं हाड वाढणं हे या दुखण्यामागचं कारण असू शकतं. बोन स्पर असं या आजाराचं नाव आहे. टाचेचे हाड अचानक वाढते. काहींना ते जाणवतही नाही. तर काहींना त्याचा प्रचंड त्रास होतो. अशी अनेक कारणे जरी असली तरी आणखी एक कारण आहे जे आपल्या लक्षातही येत नाही ते म्हणजे चुकीच्या चप्पला वापरणे.
अनेकदा चुकीच्या चप्पला वापरल्याने टाचा दुखतात. डॉ. अश्विन विजय यांनी सांगितल्यानुसार, चुकीच्या चप्पला वापरल्याने पायाच्या टाचा आणि बोटे दुखतात. फक्त दुखतच नाहीत तर त्यांचा आकारही बदलू शकतो.
हायहील्स दिसायला जरी छान असल्या तरी त्यांच्यामुळे पायांना दुखापत होते. टाचांचा भाग बोटांपेक्षा जास्त वरच्या दिशेला असल्याने बोटांवरही जोर जास्त पडतो. अनेक डॉक्टर सांगतात की चप्पला नेहमी सपाटच वापराव्यात.
पॉइंटेड चप्पला आजकाल फार वापरल्या जातात. त्या फार क्लासि लूक देतात. मात्र त्यांच्या आकारामुळे बोटे आखडतात. हॅमर टो नावाचा आजार पॉइंटेड चप्पलांमुळे होतो. हाडे आखडतात. तसेच हॅलेक्स वॅलगस नावाचा एक आजार आहे, ज्यामध्ये आंगठा वाकडा होतो. हा आजारही अशा चप्पला वापरल्याने उद्भवतो. तुम्हीही जर अशा चप्पला वापरत असाल तर त्या वापरणं बंद करा.