Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन

हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन

जेवताना मोबाईल वापरणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 20:03 IST2025-06-15T19:53:32+5:302025-06-15T20:03:39+5:30

जेवताना मोबाईल वापरणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

does using phone while eating increase blood sugar levels | हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन

हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन

जेवताना मोबाईल वापरणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेवताना फोन वापरणं केवळ लक्ष विचलित करत नाही तर ब्लड शुगर आणि वजन वाढण्याचं एक मोठं कारण देखील बनू शकतं.

जेवताना मोबाईलमध्ये व्यस्त राहिल्याने लोक त्यांच्या अन्नाचं प्रमाण आणि पोषण याकडे लक्ष देत नाहीत. असं केल्याने लोक अनेकदा प्रक्रिया केलेले किंवा कमी पौष्टिक अन्न खातात, ज्यामुळे आपल्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते. जर हे वारंवार घडलं तर इन्सुलिन रेसिस्टेन्सचा धोका देखील वाढतो. हे नंतर टाइप २ मधुमेहासारख्या आजारांमध्ये बदलू शकतं.

तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, जेव्हा लोक पूर्ण लक्ष देऊन अन्न खात नाहीत तेव्हा ते त्यांच्या शरीरातील भूक लागण्याच्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे जास्त खाणं सुरू होतं आणि वजन वाढू लागतं. या प्रकारचं वजन वाढणं मेटाबॉलिक आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं.

अन्नाचा प्रकार आणि प्रमाण ब्लड शुगर लेव्हलवर थेट परिणाम करतं. अन्नामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, विशेषतः प्रक्रिया केलेले पदार्थ जसं की व्हाईट ब्रेड, पास्ता, बर्गर, शुगर ड्रिंक लवकर पचतात आणि ब्लड शुगर देखील लवकर वाढवतात. दुसरीकडे फायबरयुक्त जेवण आणि हिरव्या भाज्या ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात कारण ते हळूहळू पचतात.

मन लावून खाणं ही एक अशी सवय आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्याच्या अन्नाच्या प्रत्येक घासाकडे लक्ष देतं, जसं की ते नेमकं काय खात आहे, ते किती खात आहेत आणि पोट कधी भरणार आहे? या सवयी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतात. नियमित व्यायाम केल्यास ब्लड शुगरचा वापर हा एनर्जीच्या रुपात केला जातो. 
 

Web Title: does using phone while eating increase blood sugar levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.