Join us

रोज खातो त्या पांढऱ्या मिठानं किडनी डॅमेज होते का? डॉक्टरांनी दिलेला सल्ला वाचा आणि धोका टाळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:59 IST

Kidney Health Tips : प्रश्न असा आहे की, पांढरं मीठ किडनीसाठी खरंच घातक आहे का? याबद्दल जाणून घेण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानू मिश्रा यांनी माहिती दिली आहे.

Kidney Health Tips : आजकालची बिघडलेली लाइफस्टाईल आणि अनहेल्दी आहार यांचा सर्वाधिक परिणाम आपल्या किडनीवर होतो. एका अहवालानुसार, गेल्या ५-६ वर्षांत २५ ते ३० वयोगटातील डायलिसिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशातील सुमारे १२ टक्के पुरुष आणि १४ टक्के महिला किडनीच्या एखाद्या ना एखाद्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यामुळेच किडनीचे आजार हे देशातील मृत्यूचं पाचवं मोठं कारण बनले आहेत.

किडनीचं काम म्हणजे शरीराची आतील स्वच्छता राखणं. ती रक्तातील विषारी तत्व गाळून शरीराबाहेर टाकते आणि शरीर निरोगी ठेवते. किडनी हेल्दी ठेवण्यासाठी तज्ज्ञ पुरेसं पाणी पिण्याचा आणि मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. पण प्रश्न असा आहे की, पांढरं मीठ किडनीसाठी खरंच घातक आहे का? याबद्दल जाणून घेण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानू मिश्रा यांनी माहिती दिली आहे.

गरजेपेक्षा जास्त मीठ खाणं ठरू शकतं धोकादायक

डॉ. मिश्रा सांगतात की पांढरं मीठ, जे आपण रोजच्या आहारात चव वाढवण्यासाठी वापरतो, ते शरीरासाठी आवश्यक आहे कारण त्यात सोडियम असतं. सोडियम शरीरातील पाण्याचं संतुलन राखतं आणि नसां व स्नायूंच्या कार्यात मदत करतं. मात्र, जर मीठ जास्त खाल्लं, तर ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. जास्त मिठामुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो.

हाय बीपीमुळे किडनीला त्रास

सतत ब्लड प्रेशर हाय राहिल्याने किडनीवर ताण येतो आणि तिची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे किडनी डॅमेज होण्याचा किंवा किडनी फेल्युअरचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला आहे की, दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हेच WHO ने देखील सांगितलं आहे.

ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा किडनीचे आजार आहेत, त्यांनी मिठाचं प्रमाण आणखी कमी ठेवावं. पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ किंवा लो-सोडियम मीठ वापरू शकतात.

उपाय आणि लाइफस्टाईलमध्ये बदल

खाद्यपदार्थांची लेबल वाचा: “Low sodium”, “Reduced salt” किंवा “No salt added” असे शब्द लक्षात घ्या. 

हर्ब्स आणि स्पाईस वापरा: मीठाऐवजी हर्ब्स, मसाले, लिंबाचा रस, आले-लसूण, धने, जिरे इत्यादींचा वापर करा. 

घरचे जेवण जास्त करा: रेस्टॉरंट व प्रोसेस्ड फूड कमी खाणं; घरी स्वयंपाक करूनच नियंत्रण आणू शकतो. 

नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रण: हलकी चाल, योग, तणाव न घ्यायचे या गोष्टी रक्तदाब कमी ठेवण्यात मदत करतात.

नियंत्रित व वेळोवेळी तपासणे: रक्तदाब, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन, इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम) वेळोवेळी तपासणे गरजेचे.

औषधे काळजीपूर्वक घ्या: काही अँटी-इंफ्लेमेटरी व इतर औषधे किडनीवर परिणाम करू शकतात, डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेऊ नयेत. 

धान्य व पोषण : काही आयुर्वेदिक औषधे किंवा सप्लीमेंट्स किडनीवर ताण आणू शकतात, त्यामुळे वापरताना डॉक्टरांना सांगावे.

मिठाचं प्रमाण वाढल्याचे संकेत

- पोट फुगणे

- पोटात सूज

- हाय ब्लड प्रेशर

- पुन्हा पुन्हा तहान लागणे आणि लघवी लागणे

- झोपेची समस्या

- कमजोरी

English
हिंदी सारांश
Web Title : White salt: Does it damage kidneys? Doctor's advice to avoid risk

Web Summary : Excessive salt intake raises blood pressure, straining kidneys. Limit daily intake to 5 grams. Use herbs, spices instead. Regular checkups and a healthy lifestyle are crucial.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य