Join us

पालथं झोपण्याची सवय घातक, ठरु शकते हृदयविकाराचेही कारण- डॉक्टर सांगतात झोपण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 15:30 IST

Does Sleeping On Your Stomach Increase The Risk Of Heart Attack Expert Tells : Is Sleeping On Your Stomach Bad For Your Heart : Do you sleep on stomach You may be at increased risk of cardiac arrest : पोटावर झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का, वेळीच लक्ष द्या डॉक्टर सांगतात...

बरेचदा आपण झोपताना आपल्या झोपेच्या पोजिशनकडे फारसे लक्ष देत नाही. आपल्याला ज्या स्थितीत कम्फर्टेबल किंवा रिलॅक्स वाटेल आपण त्याच स्थितीत झोपणे पसंत ( Is Sleeping On Your Stomach Bad For Your Heart) करतो. परंतु आपल्या झोपेच्या पोजिशनचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहित नसते. काहीजणांना  पोटावर म्हणजेच उलटं झोपणं (Does Sleeping On Your Stomach Increase The Risk Of Heart Attack Expert Tells) आरामदायक वाटतं, त्यामुळे त्यांना शांत झोप लागते. मात्र या सवयीबद्दल अनेकवेळा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कारण या झोपण्याच्या सवयीचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो(Do you sleep on stomach You may be at increased risk of cardiac arrest).

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, हृदयरोगतज्ज्ञ असलेले डॉ. निरंजन हिरेमठ यांनी, onlymyhealth.com या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार, त्यांच्यामते पोटावर झोपल्याने काही लोकांना तात्पुरता आराम मिळतो, परंतु दीर्घकालीन दृष्टीने पाहता ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयविकाराचे धोके किंवा समस्या आहेत, अशांसाठी पोटावर झोपणं अधिक त्रासदायक ठरू शकतं. पोटावर झोपण्याची सवय दीर्घकाळ असणं हृदय व शारीरिक आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतं, म्हणूनच याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. 

पोटावर झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का?

डॉ. निरंजन हिरेमठ यांच्या मते, पोटावर झोपण्याला 'प्रोन पोझिशन' म्हणून ओळखले जाते. पोटावर झोपणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असते. असे केल्याने पाठीचा कणा, हृदयाच्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असू शकते. पोटावर झोपण्याने हृदयाला थेट नुकसान होत नसले तरी, असे केल्याने रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात, शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह विस्कळीत होतो आणि झोपेवर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

सगळे ग्रीन टी पितात म्हणून तुम्हीही पिता? पाहा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ - तरच तब्येतीला बरे...

डॉक्टर निरंजन म्हणतात की पोटावर झोपण्याचा हृदयविकाराच्या धोक्याशी थेट संबंध नाही. पोटावर झोपल्याने ज्यांना आधीच हृदयविकार, श्वसन समस्या आणि स्लीप एपनियाचा त्रास आहे त्यांना आरोग्याशी संबंधित अधिक समस्या त्रास देऊ शकतात. या समस्यांमुळे  श्वास घेण्यास त्रास, पाठ आणि मान दुखण्याचा त्रास होऊ शकतो. ताण वाढणे आणि झोपेचा त्रास होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. झोपेशी संबंधित समस्यांमुळे उच्च रक्तदाब, तणाव संप्रेरकांचे प्रमाण वाढणे आणि हृदयाशी संबंधित समस्या येऊ शकतात.

सांधेदुखी सतावते? दीपिका पदुकोणची न्यूट्रिशनिस्ट सांगते 'स्वस्त' घरगुती उपाय - वेदना होतील कमी...

झोपेची गुणवत्ता आणि हृदयाच्या समस्या... 

जेव्हा झोपेची गुणवत्ता बिघडते तेव्हा त्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, कमी झोपणाऱ्या, निद्रानाश किंवा स्लीप एपनिया ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. सतत कमी झोपेच्या समस्येमुळे, लोकांना उच्च रक्तदाब, वाढता ताण आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होण्यासारख्या समस्या उद्भवतात.

दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

हृदयाच्या आरोग्यासाठी झोपण्याची चांगली स्थिती कोणती?

डॉक्टर निरंजन यांच्या मते, पाठीवर किंवा डाव्या कुशीवर झोपणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पाठीवर झोपल्याने संपूर्ण शरीरात वजन समान प्रमाणात वितरित होण्यास आणि हृदयावरील दाब कमी होण्यास मदत होते, तर डाव्या कुशीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाफिटनेस टिप्स