Join us

छातीजवळ सारखी खाज सुटते? चुकीची ब्रेसियर वापरणं ठरतंय धोकादायक, मोठ्या आजाराची लक्षणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 13:39 IST

Does itchy chest troubles you? Wearing the wrong bra can be dangerous, a sign of a serious illness see what you need to know : छातीजवळ खाज सुटण्यामागे असू शकतात अनेक कारणे. पाहा काय करायचे.

महिलांनो!! त्वचेची काळजी घेणे फारच महत्त्वाचे असते. काळजी घेणे म्हणजे पार्लरला जाणे नाही. किंवा फक्त सौंदर्याची कालजी नाही. तर त्वचेला कोमता त्रास होऊ नये याची काळजी.  (Does itchy chest troubles you? Wearing the wrong bra can be dangerous, a sign of a serious illness see what you need to know)चेहर्‍याची त्वचा, हाताची त्वचा, आपण नेहमीच काळजी घेतो पण शरीराच्या इतर अवयवांवरील त्वचेकडे मात्र फार लक्ष देत नाही. अंघोळ करताना सगळं स्वच्छ झालं असेल, असे गृहीत धरतो. शरीराला स्वच्छ राहण्यासाठी अंघोळी व्यतिरिक्त इतरही गोष्टींची गरज असते. ती काळजी न घेतल्याने मग खाज सुटते, रॅश उठतात, विविध त्रास उद्भवतात. अनेक महिलांना छातीजवळ सारखी खाज सुटते. छातीच्या खालचा भाग कायम झाकलेला राहतो. त्यामुळे तेथे घामही जास्त येतो. घाम त्याच जागी तसाच सुकून जातो. कधी छातीच्या खालून हात फिरवून पाहा. बराच मळ साचलेला असतो. अंघोळ केली तरी असा त्रास होतो. अशा ठिकाणी  घाम, मळ साठून राहिल्याने ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे शरीराचे असे भाग जे कायम झाकलेले असतात त्यांची जास्त काळजी घेतली जात नाही मात्र अशा जागा स्वच्छच हव्या. त्यांची काळजी जरा जास्त घ्यायला हवी. 

१.छातीला खाज सुटण्याची अनेक कारणे असतात.  त्यापैकी एक म्हणजे चुकीची ब्रेसियर वापरणे. स्तनांचा आकार छान सुबक दिसावा यासाठी आजकाल विविध ब्रेसियर मिळतात. महिला त्या वापरतात. त्या अति घट्ट असतात. घट्ट असल्याने खाज सुटते. छाती दाबली जाईल अशा घट्ट ब्रेसियर वापरू नयेत. मऊ, चांगल्या दर्जाची आणि अति घट्ट न बसणारी ब्रेसियर वापरा. स्तनांच्या आकारानुसारच ब्रेसियर वापरा. जास्त घट्ट वापरल्याने छातीवर फारच ताणही येतो.   

२. अंघोळ झाल्यानंतर पावडर लावायची. छाती जवळच्या भागात चांगली भरपूर पावडर लावायची. छातीला वारा लागू द्यायचा. घरी असताना ब्रेसियर काढून ठेवायची. कायम घालून नाही बसायचे असे केल्याने छातीला त्रास होतो. जरा मोकळे ठेवले म्हणजे खाज येत नाही. छातीलाही बॉडी लोशन लावायचे.

३. पावसाळ्यात आंबट ओलसर कपडे घातल्यामुळे छातीजवळ खाज सुटून लालसरपणा येतो. उन्हाळ्यात उन्हामुळे त्वचा करपते. हिवाळ्यात थंडीमुळे कोरड पडते. त्यामुळे कायमच काळजी घ्यावी. गुलाब पाण्याचा बोळा छाती जवळून फिरवायचा. असे केल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. जास्त त्रास होत नाही. 

४. काही ऍलर्जी झाली असेल तरी खाज सुटते. त्यामुळे काळपटपणा, डाग, जळजळ असे अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे कालजी घ्या. सामान्य कारणांमुळे होणाऱ्या त्रासाचे रुपांतर मोठ्या समस्येत होणार नाही याची काळजी घ्यायची.   

टॅग्स : आरोग्यपाऊसहेल्थ टिप्समहिला