Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने खरंच पोट साफ होण्यास मदत होते का? पाहा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:24 IST

Drinking Water In The Morning Benefits : खरंच सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने प्रेशर तयार होण्यास मदत मिळते का?

Drinking Water In The Morning Benefits : अनेक हेल्थ एक्सपर्ट आणि घरातील मोठे लोकही सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी पाणी पिण्याचा सल्ला देतात. कुणी कोमट पाणी पितात किंवा साधं पाणी पितात. पोट साफ होण्यास याने मदत मिळते असं सांगितलं जातं. पण खरंच पाण्याने सकाळी प्रेशर तयार होण्यास मदत मिळते का? तर होय...पाण्याचा संबंध डायजेशन सिस्टीम आणि शरीरात वेगवेगळ्या प्रक्रियेसोबत जुळलेला आहे. बद्धकोष्ठता कॉमन समस्या आहे जी अनेकांना होते. यात पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि मलत्याग करण्यास त्रास होतो. बऱ्याच लोकांना नेहमीच ही समस्या होते. जास्तीत जास्त केसेसमध्ये पाणी कमी पिणे आणि कमी फायबर असलेला आहार न घेणे याची कारणं असतात. अशात सकाळी पाणी प्यायल्याने ही समस्या बरीचशी कमी केली जाऊ शकते.

पाणी प्यायल्याने प्रेशर तयार होतं?

Apecwater च्या रिपोर्टनुसार, मुळात जेव्हा सकाळी आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपली आतडी सक्रिय होते. याला मेडिकल भाषेत 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स" म्हटलं जातं. ज्यात जेवण किंवा पाणी पोटात गेल्यार मोठ्या आतडीमध्ये हालचाल वाढते. याच कारणाने बऱ्याच लोकांना सकाळी पाणी प्यायल्यावर प्रेशर जाणवतं. पचनक्रिया कशी होते हे सांगायचं तर जेव्हा खाल्लेलं अन्न छोट्या आतडीतून मोठ्या आतडीमध्ये जातं, तोपर्यंत त्यातील पोषक तत्व निघून जातात. मोठ्या आतडीचं काम अन्नातील पाणी शोषून घेऊन ते कडक बनवणं असतं. जर शरीरात पाणी कमी असेल तर आतडी जास्त पाणी शोषून घेते, ज्यामुळे विष्ठा ठोस आणि कोरडी होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते.

पाण्याची काय असते भूमिका?

याच ठिकाणी पाण्याची महत्त्वाची भूमिका समोर येते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने मलामध्ये ओलावा टिकून राहतो. त्यामुळे मल मऊ होतो आणि तो सहज बाहेर पडण्यास मदत होते. म्हणूनच असं म्हटलं जातं की पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

मात्र फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात फायबरयुक्त आहार घेत नसाल, तर पाण्याचा परिणाम मर्यादित राहू शकतो. चांगले परिणाम मिळवण्यासाठी पाण्यासोबत फळं, भाज्या आणि फायबरने भरपूर असलेला आहार आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की पिणं गरजेचं आहे. काही वेळा यापेक्षा जास्त पाणी पिणंही फायदेशीर ठरू शकतं, खासकरून शरीरात डिहायड्रेशनची समस्या असल्यास. तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दारू आणि जास्त कॅफिन असलेले पेय पदार्थ शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करू शकतात. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊन बद्धकोष्ठतेची समस्या आणखी वाढू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Does drinking water on an empty stomach help relieve constipation?

Web Summary : Drinking water in the morning stimulates the intestines and aids digestion, relieving constipation. Water softens stool, promoting easier bowel movements. Fiber-rich diet is also essential. Avoid dehydrating drinks for better results.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स