Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शहाळ्याची मलई खाल्ल्याने खरंच कोलेस्टेरॉल वाढतं का ? डाएटिशियन सांगतात, दिवसाला किती आणि कशी खावी मलई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2026 14:46 IST

does coconut malai increase cholesterol : can you eat coconut malai with high cholesterol : कोलेस्टेरॉल वाढलंय? मग शहाळ्याची मलई खावी की खाऊ नये, पाहा डाएटिशियन सांगतात उत्तर...

उन्हाळ्यात शहाळ्याचं पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यासोबतच अनेकांना शहाळ्याची मऊ, चविष्ट मलई खायलाही खूप आवडते. मात्र आरोग्याची काळजी घेताना मनात एक प्रश्न नेहमी पडतो की, शहाळ्याची मलई खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतं का? विशेषतः ज्यांना आधीपासूनच कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांनी ही मलई खावी की टाळावी याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो(can you eat coconut malai with high cholesterol).

'कोलेस्टेरॉल' हा शब्द ऐकताच आपण चरबीयुक्त पदार्थ खाणंच सोडून देतो. अशातच शहाळ्याची मलई, जी दिसायला पांढरी आणि घट्ट असते, तिला आपण 'बॅड फॅट' समजून अनेकदा खाणं टाळतो. परंतु शहाळ्याच्या मलईमध्ये असलेले फॅट्स हे शरीरासाठी नेहमीच वाईट नसतात? शहाळ्याच्या मलईमध्ये नैसर्गिक फॅट्स, कॅलरीज आणि काही महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे तिचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. योग्य प्रमाणात ही मलई खाल्ल्यास (does coconut malai increase cholesterol) ती फायदेशीर ठरू शकते, पण जास्त प्रमाणांत खाणं आरोग्यासाठी नुकसानकारकही ठरू शकतं. शहाळ्याची मलई आणि कोलेस्टेरॉल यांचा (can people with high cholesterol eat coconut malai safely) नेमका काय संबंध आहे आणि कोलेस्टेरॉल वाढलेलं असताना ती खाणं योग्य आहे की नाही, ते पाहूयात. 

शहाळ्याची मलई आणि कोलेस्टेरॉल.... 

डाएटिशियन श्वेता जे. पांचाल यांच्या मते, प्रत्येक फॅटयुक्त पदार्थ नुकसानदायक नसतो आणि योग्य प्रमाणात खाल्लेल्या नारळाच्या मलईला घाबरण्याची गरज नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कोलेस्टेरॉलशी संबंधित योग्य माहिती समजून घेतली पाहिजे आणि आपला आहार संतुलित ठेवला पाहिजे. फूड कोलेस्टेरॉल आणि ब्लड कोलेस्टेरॉलमधील फरक हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.  खाण्यातील कोलेस्टेरॉल (Dietary cholesterol) आणि रक्तातील कोलेस्टेरॉल (Blood cholesterol) हे दोन्ही एकसारखे नसतात. शरीरातील साधारण ८०% कोलेस्टेरॉल लिव्हर स्वतः बनवते, तर फक्त २०% कोलेस्टेरॉल अन्नातून येते. यासाठीच प्रत्येक फॅट्स असलेल्या पदार्थाला नुकसानदायक मानणे योग्य नाही. तुम्ही योग्य प्रमाणात शहाळ्याची मलई खाण्याचा आनंद घेऊ शकता.

स्टिल - पितळ की माती...कोणत्या भांड्यात दूध तापवावं ? 'या' भांड्याचा करा उपयोग - साय येईल जाडजूड...

कोलेस्टेरॉल नेमके कशामुळे वाढते?

डाएटिशियन श्वेता जे. पांचाल यांच्या मते, योग्य प्रमाणांत खाल्लेली शहाळ्याची मलई कोलेस्टेरॉल वाढण्यास कारणीभूत ठरतं नाही. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) वाढवण्यासाठी खालील गोष्टी जास्त कारणीभूत ठरतात. 

१. अल्ट्रा-प्रोसेस्ड स्नॅक्स: चिप्स, पॅकेज्ड फूड.
२. रिफाईंड कार्ब्स: मैदा, व्हाईट ब्रेड.
३. जास्त साखर असलेले ड्रिंक्स.
४. ट्रान्स फॅट: पॅकेटमधील तळलेले पदार्थ.
५. सतत येणारा ताण

या गोष्टींचा परिणाम तुमच्या आरोग्यावर जास्त होतो, शहाळ्याच्या मलईचा नाही. त्यामुळे संतुलित आहार घेणे केव्हाही उत्तम. 

अंथरुणावर पडताच डोक्यात निगेटिव्ह विचारांचं काहूर - झोपेचं होतं खोबरं? ५ सोप्या गोष्टी करा - मन शांत होईल...

शहाळ्याची मलई किती आणि कशी खावी?

नारळ मलईमध्ये हेल्दी फॅट्स असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती जास्त प्रमाणात खाऊ शकता. शहाळ्याची मलई कधीतरी थोड्या प्रमाणात खाणे ठीक आहे. रोज मोठ्या प्रमाणात खाणे टाळा. शहाळ्याची मलई खाण्यासोबतच फळ, भाज्या आणि फायबरचा डाएटमध्ये समावेश करा.

शहाळ्याची मलई खाणं टाळावं का ? 

शहाळ्याच्या मलईमध्ये हेल्दी फॅट्स असतात. जर तुम्हाला हाय कोलेस्टेरॉल असेल तरीही ती पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. संतुलित प्रमाणात खाणे सुरक्षित आहे. कधीतरी थोड्या प्रमाणात खाणे ठीक आहे, पण रोज मोठ्या प्रमाणात खाणं टाळावं.

English
हिंदी सारांश
Web Title : Does coconut cream increase cholesterol? A dietitian explains all.

Web Summary : Coconut cream contains healthy fats, but moderation is key, especially with high cholesterol. Dietician advises balanced eating habits over fearing all fats. High cholesterol is often linked to processed foods, refined carbs, sugary drinks, trans fats and stress.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सउन्हाळासमर स्पेशल