Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंघोळ करताना 'या' एका चुकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव, डॉक्टरांचा इशारा...

आंघोळ करताना 'या' एका चुकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव, डॉक्टरांचा इशारा...

Health Tips : जास्त गरम पाण्यानं आंघोळ करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:41 IST2025-06-19T10:39:39+5:302025-06-19T10:41:09+5:30

Health Tips : जास्त गरम पाण्यानं आंघोळ करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Doctor warn why excessively hot shower can cause death | आंघोळ करताना 'या' एका चुकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव, डॉक्टरांचा इशारा...

आंघोळ करताना 'या' एका चुकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव, डॉक्टरांचा इशारा...

Health Tips : आंघोळीसाठी कसं पाणी घ्यावं हा विषय नेहमीच चर्चेत असतो. यावर वेगवेगळे रिसर्चही समोर येत असतात. कारण आंघोळीचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. काही लोक थंड पाण्यानं आंघोळ करतात तर काही लोक गरम पाण्यानं आंघोळ करतात. पण जास्त गरम पाण्यानं आंघोळ करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

जर्मनीतील वस्कुलर हेल्थ एक्सपर्ट डॉ. मॅक्स मड्डाहाली यांनी इशारा दिला आहे की, फार जास्त गरम पाण्यानं आंघोळ करणं आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. डेली मेलच्या एका रिपोर्टमध्ये डॉ. मॅक्स यांनी सांगितलं की, फार जास्त गरम पाण्याचं शॉवर घेतल्यानं ब्लड प्रेशर अचानक कमी होतं, ज्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध पडू शकता. अशात जर तुम्ही बाथरूममध्ये पडले, डोक्याला किंवा शरीराला गंभीर इजा होण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर ही स्थिती जीवघेणी देखील ठरू शकते.

गरम पाण्यानं आंघोळ करण्याचा धोका

गरम पाण्यामुळे शरीराच्या त्वचेतील रक्तवाहिन्या अधिक पसरट होतात. ही नॅचरल प्रोसेस आहे, ज्यात शरीरात स्वत:ला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतं. पण यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि तुम्हाला चक्कर येते किंवा तुम्ही बेशुद्ध पडू शकता. बाथरूममध्ये घसरून पडणं घातक ठरू शकतं. 

काय काळजी घ्याल?

डॉक्टरांनी सांगितलं की, जर आंघोळ करताना चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर शॉवरचं तापमान थोडं कमी करा. टेम्प्रेचर लॉक इन्स्टॉल करा, जेणेकरून शॉवर जास्त गरम होऊ नये. ज्यांना चक्कर येण्याची समस्या होते अशा लोकांनी बाथरूममध्ये ग्रॅब बार लावा. त्याशिवाय मेडिकल अलर्ट डिवाइस वापरू शकता. जेणेकरून तुम्ही पडले तर अलार्म देऊ शकाल.

गरम पाण्याचा त्वचा आणि केसांवर प्रभाव

डॉक्टर म्हणाले की, फार जास्त गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेवर नॅचरल ऑइल निघून जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. तसेच गरम पाण्यानं केसांमधील नॅचरल ऑइलही नष्ट होतं. ज्यामुळे केस कमजोर आणि डॅमेज होतात.

Web Title: Doctor warn why excessively hot shower can cause death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.