Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्लड प्रेशरमुळेही डॅमेज होऊ शकते किडनी, डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे उपाय

ब्लड प्रेशरमुळेही डॅमेज होऊ शकते किडनी, डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे उपाय

Kidney Health : न्यूरोलोजिस्ट डॉक्टर प्रियंका शेहरावत यांनी सांगितलं की, तुमची किडनी हळूहळू फेल होत आहे हे तुम्हाला कळणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:57 IST2025-06-07T10:55:52+5:302025-06-07T10:57:10+5:30

Kidney Health : न्यूरोलोजिस्ट डॉक्टर प्रियंका शेहरावत यांनी सांगितलं की, तुमची किडनी हळूहळू फेल होत आहे हे तुम्हाला कळणार नाही.

Doctor told why do kidneys suddenly shut down and tips to reduce kidney stones | ब्लड प्रेशरमुळेही डॅमेज होऊ शकते किडनी, डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे उपाय

ब्लड प्रेशरमुळेही डॅमेज होऊ शकते किडनी, डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे उपाय

Kidney Health : किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. किडनींद्वारे शरीरातील विषारी तत्व तर बाहेर पडतातच, सोबतच रक्तही फिल्टर केलं जातं. त्यामुळे किडनीची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. पण अनेकदा जर किडनीमध्ये काही गडबड असेल तर त्याची आधी लक्षणंही दिसत नाहीत.

याबाबत न्यूरोलोजिस्ट डॉक्टर प्रियंका शेहरावत यांनी सांगितलं की, तुमची किडनी हळूहळू फेल होत आहे हे तुम्हाला कळणार नाही. माझ्याकडे असे अनेक रूग्ण येतात आणि सांगतात की, त्यांची क्रियाटिनिन लेव्हल वाढली आहे. पण याचं कारण आम्हाला माहीत नाही. त्यांना डायबिटीस, थायरॉइड समस्याही नव्हत्या आणि ते औषधंही घेत नव्हते.

डॉक्टर प्रियंका शेहरावत यांनी किडनीसंबंधी एका केसबाबत सांगितलं की, रूग्णाला हाय ब्लड प्रेशरची समस्या राहत होती. तो काही लक्षणं दिसल्यावर औषध घेत होता. डॉक्टर म्हणाल्या की, ब्लड प्रेशर एक सायलेंट किलर आहे.

डॉक्टर म्हणाल्या की, जर बीपी जर सतत १४० च्या वर राहत असेल, शरीरातील सगळ्याच अवयवांना रक्त पुरवठा कमी होतो. नंतर शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. अशात किडनी सुद्धा योग्यपणे रक्त फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे शरीरात क्रियाटिनिनची लेव्हल वाढते.

ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय

जर तुमचं ब्लड प्रेशर १४० च्या वर राहत असेल तर घरीच बीपी चार्ट तयार करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, मीठ कमी खा, रोज ३० मिनिटं फिजिकल अॅक्टिविटी करा, जेवणात फायबरचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या.

किडनीतून स्टोन काढण्याचे उपाय

डॉक्टरांनी एका वेगळ्या व्हिडिओत सांगितलं की, किडनीचे स्टोन कॅल्शिअम ऑक्सलेट असतात. लघवीमध्ये जेव्हा कॅल्शिअम आणि ऑक्सलेट वाढतं तेव्हा या दोन्ही गोष्टी मिळून स्टोन तयार होतात. अशात स्टोन काढण्यासाठी खालील काही उपाय करू शकता.

मीठ कमी खा

किडनी स्टोनचा धोका टाळायचा असेल तर मीठ कमी खाणं कमी करा. दिवसभरातून पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. अशानं कॅल्शिअम २४ तासात लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतं.

आंबट फळं जास्त खा

किडनी स्टोन कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे आंबट फळं आणि भाज्या खा. तुम्ही आहारात संत्री, लिंबू, मोसंबी, कीवी यांचा आहारात समावेश करा. या फळांनी कॅल्शिअमचं सीक्रेशन लघवीमध्ये कमी होतं.

ऑक्सलेट असलेले पदार्थ कमी खा

ऑक्सलेट भरपूर असलेले पदार्थ कमी खावेत. पालक, बीट, रताळे आणि गोड पदार्थ यांमध्ये भरपूर ऑक्सलेट असतं. जेणेकरून ऑक्सलेट लघवीत वाढू नये आणि कॅल्शिअमसोबत मिळून स्टोन बनू नये.

पाणी जास्त प्या

किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावं. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, दिवसभरातून किमान २ ते ३ लीटर पाणी प्यायला हवं. यानं स्टोनचा धोका कमी होतो.
 

Web Title: Doctor told why do kidneys suddenly shut down and tips to reduce kidney stones