Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफ न होण्याचा त्रास रोज छळतो? खा ही ६ फळं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

पोट साफ न होण्याचा त्रास रोज छळतो? खा ही ६ फळं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

Constipation : बरेच लोक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे चूर्ण, चटणी, औषधं घेतात. पण या उपायांनी काही वेळासाठीच आराम मिळतो, असं डॉक्टर विनोद शर्मा यांचं मत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:04 IST2025-06-06T13:25:30+5:302025-06-06T19:04:11+5:30

Constipation : बरेच लोक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे चूर्ण, चटणी, औषधं घेतात. पण या उपायांनी काही वेळासाठीच आराम मिळतो, असं डॉक्टर विनोद शर्मा यांचं मत आहे.

Doctor told about 6 fiber rich fruits that can relieve constipation | पोट साफ न होण्याचा त्रास रोज छळतो? खा ही ६ फळं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

पोट साफ न होण्याचा त्रास रोज छळतो? खा ही ६ फळं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

Constipation : आजकाल भरपूर लोकांना बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या नेहमीच होत राहते. जर नेहमीच पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर पोटदुखी, उलटी, मळमळ, गॅस, अॅसिडिटी, हीट बर्न, पाइल्स, एनल फिशर आणि आतड्यांचा कॅन्सर अशा गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं खूप महत्वाचं ठरतं. 

बरेच लोक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे चूर्ण, चटणी, औषधं घेतात. पण या उपायांनी काही वेळासाठीच आराम मिळतो, असं डॉक्टर विनोद शर्मा यांचं मत आहे. अशात त्यांनी पोट व्यवस्थित रोज साफ होण्यासाठ काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. तसेच त्यांनी पोट साफ न होण्याची काही मुख्य कारणे देखील सांगितली आहेत.

बद्धकोष्ठतेची कारणं..

बद्धकोष्ठतेची समस्या होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे की, पाणी कमी पिणे, आहारात फायबर नसणे, शरीराची हालचाल न करणे, पुरेशी झोप न घेणे, तणाव, काही औषधं, वाढतं वय आणि गर्भावस्था.

बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

केळी

केळ्यांमध्ये प्रोबिओटिक फायबर भरपूर असतं, जे पोटात गुड बॅक्टेरिया वाढवतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र चांगलं राहतं. रोज जर किमान एक केळ जरी खाल्लं तर पचन तंत्र चांगलं राहतं आणि सोबतच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.

कीवी

कीवी हे एक असं फळ आहे ज्यात फायबर भरपूर असतं. तसेच इतरही असे अनेक तत्व असतात जे रोज पोट साफ होण्यास मदत करतात.

पेर

पेर नियमितपणे खाल तर विष्ठा मुलायम होण्यास मदत मिळते. ज्यामुळे सकाळी पोट लगेच साफ होतं. यात फायबर आणि फ्रुक्टोज असतं. जे विष्ठेला मुलायम करतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

अंजीर

या फळांमध्येही फायबर भरपूर असतं. तुमचं जर पोट नेहमीच साफ होत नसेल तर हे फळं नियमितपणे खावं. यातील फायबरनं पोट लगेच साफ होतं. ज्यामुळे तुम्हाला टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसण्याची गरज पडणार नाही.

सफरचंद

सफरचंदामध्येही भरपूर फायबर असतं, ज्यामुळे विष्ठा मुलायम होण्यास मदत मिळते. त्यासोबतच पोट साफ करण्यासाठी पपई सुद्धा एक चांगला पर्याय आहे. 
 

Web Title: Doctor told about 6 fiber rich fruits that can relieve constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.