Join us

चहाशिवाय जमत नाही पण चहा पिऊन ॲसिडिटी-जळजळ होते? डॉक्टरांनी सांगतात ३ सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:58 IST

How To Avoid Acidity After Tea: अनेकांना अशीही तक्रार असते की, चहा प्यायल्यानंतर त्यांच्या छातीत जळजळ होते किंवा अ‍ॅसिडिटी होते. या समस्या झाल्या तर दिवसभर अस्वस्थ वाटू लागतं.

How To Avoid Acidity After Tea: भारतात चहा पिण्याचे शौकीन लोक भरपूर आहेत. जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात सकाळच्या चहानं होते. कुणी काळा चहा पितात तर कुणी दुधाचा. पण अनेकांना अशीही तक्रार असते की, चहा प्यायल्यानंतर त्यांच्या छातीत जळजळ होते किंवा अ‍ॅसिडिटी होते. या समस्या झाल्या तर दिवसभर अस्वस्थ वाटू लागतं. अशात चहा प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी का होते आणि यापासून कशी सुटका मिळवाल हे आपण एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

चहा प्यायल्यावर का होते अ‍ॅसिडिटी?

याबाबत गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर निवेदिता यांनी 'गुडडीड क्लीनिक' नावाच्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या सांगतात की, 'तुम्ही तीन गोष्टींची काळजी घेऊन चहा प्यायल्यावर झालेल्या अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवू शकता'.

चहा योग्य पद्धतीनं करा

डॉक्टर सांगतात की, अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्या होते कारण ते चहा खूप जास्त वेळ उकडतात. चहा जास्त उकडल्यानं यात टॅनिनचं प्रमाण अधिक वाढतं. ज्यामुळे गट लानिंगचं नुकसान होतं. टॅनिन वाढल्यानं अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ लागते. अशात चहा जास्त उकडणं टाळा. 

चहा आणि चटपटीत पदार्थ

बऱ्याच लोकांना चहासोबत काहीतरी चटपटीत पदार्थ खाण्याची सवय अससते. या कारणानं देखील अ‍ॅसिडिटीची समस्या होते. चटपटीत पदार्थामधील तेल आणि मसाले दुधासोबत मिळून पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण वाढवतात. अशात सकाळच्या चहासोबत काही चटपटीत खाऊ नका.

जास्त मसालेदार चहा टाळा

डॉक्टर सांगतात की, गरमीच्या दिवसांमध्ये जास्त मसालेदार चहा पिणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात आलं, दालचीनी किंवा वेलचीमुळे चहा अधिक उष्ण होतो. ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी चहामध्ये कमी टाकाव्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य