How to prevent Heart Attack : हार्ट अॅटॅक जगभरात एक मोठी समस्या बनत चालली आहे. कमी वयातच हार्ट अॅटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. जगात सगळ्यात जास्त मृत्यूचं कारण हार्ट अॅटॅक ठरत आहे. तरूण आणि फिट दिसणारे लोकही हार्ट अॅटॅकनं आपला जीव गमावत आहेत. हार्ट अॅटॅक येणार असेल तर छातीत वेदना, दम लागणे, जबडा आणि खांद्यात वेदना, पाठीत वेदना, उजवा हात दुखणे अशी लक्षणं दिसू लागतात. यातील कोणतंही लक्षण दिसत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नये.
हार्ट अॅटॅक येण्याची कारणं...
हार्ट अॅटॅक येण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणजे शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढणं आणि दुसरं कारण म्हणजे बीपी वाढणं. जेव्हा कोलेस्टेरॉल नसांमध्ये जमा होतं तेव्हा ब्लड फ्लो सुरळीत होत नाही. त्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल हेच आजकाल हार्ट अॅटॅक येण्याचं मुख्य कारण म्हणून समोर येत आहे.
तर हाय ब्लड प्रेशरमुळे नसा आकुंचन पावतात आणि त्यामुळे हृदयावर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे अचानक हार्ट अॅटॅक येऊ शकतो. अशात डॉक्टर सलीम जैदी यांनी 3 असे उपाय सांगितले आहेत ज्यांद्वारे तुम्ही हार्ट अॅटॅचा धोका नेहमीसाठी टाळू शकता. महत्वाची बाब म्हणजे हे तिन्ही उपाय तुमच्या किचनमध्येच उपलब्ध आहेत.
हाय बीपी-कोलेस्टेरॉल कसं कमी कराल?
लसूण
लसणामध्ये एलिसिन, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. ज्यामुळे नसांमधील ब्लॉकेज दूर होतात. रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक कच्ची कळी चावून खा. त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. जर कच्चा लसूण खाऊ शकत नसाल तर थोडा भाजून घ्या आणि मग चावून खावा.
अळशीच्या बिया
अळशीच्या बिया हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. यात भरपूर ओमेगा 3 फॅटी असतं, जे हृदयाचे स्नायू मजबूत करतं. तसेच यानं कोलेस्टेरॉल लेव्हलही कमी होते. एक चमचा अळशीच्या बियांचं पावडर दही, सूप किंवा सलादवर टाकून खाऊ शकता.
लिंबू आणि मधाचं पाणी
लिंबाच्या रसात व्हिटामिन सी असतं, जे नसांना साफ करण्याचं काम करतं. तसेच हृदयावरील सूजही कमी करतं. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस टाका. हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं.
चालणं आणि हेल्दी डाएट
वरील उपाय तर फायदेशीर ठरतातच, यांच्यासोबतच रोज साधारण 30 मिनिटं वॉक करा आणि हेल्दी आहार घ्या. या गोष्टी सुद्धा हृदयासाठी महत्वाच्या असतात.