Kidney Stone : किडनी स्टोन ही एक फार असह्य वेदना देणारी आणि कुणालाही होणारी समस्या आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनी स्टोनची समस्या पुहोते. किडनी स्टोनची समस्या अशी आहे जी एकदा बरी झाली की, पुन्हा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काही गोष्टींची खूप जास्त काळजी घ्यावी लागते.
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. डॉक्टर औषधं गोळ्या देतात, तर आयुर्वेद डॉक्टर जडी-बुटी देतात. काहींना लगेच आराम मिळतो तर काहींना भरपूर दिवस किंवा महिने लागतात. अशात डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे आणि भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. जाणून घ्या या टिप्स. त्याआधी किडनी स्टोन कसे तयार होतात हे जाणून घेऊया.
कसा तयार होतो किडनीमध्ये स्टोन?
डॉक्टरांनी सांगितलं की, किडनीमध्ये स्टोन कॅल्शिअम ऑक्सालेटमुळे तयार होतात. लघवीमध्ये जेव्हा कॅल्शिअम आणि ऑक्सालेट दोन्हींचं प्रमाण अधिक वाढतं तेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र जमा होतात आणि छोटे छोटे स्टोन तयार होतात.
काय आहे उपाय?
मीठ कमी
किडनी स्टोनची समस्या पुन्हा होऊ नये यासाठी मीठ कमी खाल्लं पाहिजे. सामान्यपणे रोज ५ ग्रॅम मीठ खाणं योग्य मानलं जातं. पण किडनी स्टोन होऊ नये यासाठी ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. असं केल्यानं लघवीतून कॅल्शिअम येण्याचं प्रमाण कमी होईल. कोणत्याही मिठामध्ये सोडिअमचं प्रमाण सारखंच असतं. त्यामुळे कोणतंही मीठ कमीच खावं. सिट्रिक फूड म्हणजेच आंबट फळं जसे की, लिंबू, संत्री, मोसंबी, कीवी भरपूर खावेत.
ऑक्सालेट कमी करा
ऑक्सालेट भरपूर असलेल्या गोष्टींचं सेवन कमी करावं. यात पालक, बीट, रताळे, गोड ड्रिंक इत्यादींचा समावेश करता येईल. असं केल्यास लघवीत ऑक्सालेटचं प्रमाण कमी होईल आणि कॅल्शिअमसोबत ते जुळू शकणार नाही.
भरपूर पाणी प्या
हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे की, भरपूर पाणी प्यायल्यानं किडनी स्टोन होण्याचा धोका कमी असतो. दिवसभरातून २ ते २५ लीटर पाणी नक्की प्यावं. किडनी फेलिअर आणि हृदयाच्या रूग्णांनी इतकं पाणी पिऊ नये.