Join us

सकाळी नाश्ताच केला नाही तर मेंदूला होतो अपाय, दिवसभर तुमचं वागणं बदलतं-चिडचिडही होते कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:49 IST

Breakfast Skipping Side Effects : न्यूरोसर्जन डॉ. संदीप मवानी सांगतात की, जर सकाळचा नाश्ता स्किप केला तर यानं मेंदू प्रभावित होतो.

Breakfast Skipping Side Effects : नाश्ता दिवसातील सगळ्यात महत्वाच्या आहारापैकी एक असतो. जर नियमितपणे पौष्टिक नाश्ता केला नाही तर याचा वाईट प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. बऱ्याचदा लोक बिझी शेड्युलमुळे किंवा वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करतच नाहीत. पण सकाळचा नाश्ता स्किप करण्याचा वाईट प्रभाव केवळ शरीरावरच नाही तर मेंदुवरही पडतो. न्यूरोसर्जन डॉ. संदीप मवानी सांगतात की, जर सकाळचा नाश्ता स्किप केला तर यानं मेंदू प्रभावित होतो. 

नाश्ता न करण्याचे नुकसान

एनर्जी होते कमी

मेंदू एनर्जीसाठी ग्लूकोजवर अवलंबून असतो. जर तुम्ही नाश्ता केलाच नाही तर ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास तुम्हाला समस्या येते.

मेमरी आणि कमजोर फोकस

सकाळी नाश्ता केला नाही तर न्यूरोट्रान्समिटर्ससारखे एसेटलाकॉलिन जे मेमरी आणि लर्निंग सपोर्ट कमी अ‍ॅक्टिव राहतात. ज्यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रीत करण्यास समस्या येऊ शकते.

मूड स्विंग्स आणि चिडचिड

नाश्ता स्किप केल्यानं स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल खूप वाढतो. ज्यामुळे तणाव वाढतो, चिडचिडपणा वाढतो. या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर न विसरता नाश्ता केला पाहिजे.

रिअ‍ॅक्शन टाइम स्लो होतो

लो एनर्जी सप्लायमुळे मेंदुचे न्यूरॉन्स चांगल्या पद्धतीनं कम्यूनिकेट करत नाहीत. यामुळे निर्णय घेण्याची किंवा रिस्पॉन्स देण्याच्या स्पीडवर प्रभाव पडतो.

क्रेविंग्स आणि ओवरईटिंग

जर नियमितपणे नाश्ता केला नाही तर मेंदुला भूक लागल्याचा संकेत मिळतो. सतत काहीतरी खाण्याचं मन होतं. अनेकदा नाश्ता स्किप केल्यावर दुपारचं जेवण जास्त केलं जातं.

बॅलन्स नाश्ता महत्वाचा

डॉक्टरांचा सल्ला आहे की, तुम्ही नियमितपणे संतुलित नाश्ता करायला हवा. नाश्त्यात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट भरपूर असावेत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स