Join us

चिमुटभर पावडरनं दात होतील मोत्यांसारखे चमकदार, तोंडाची दुर्गंधीही जाईल; पाहा काय आहे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:24 IST

Yellow Teeth Home Remedy : दात पिवळे होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे काही खाल्ल्यावर किंवा प्यायल्यावर काही कणं दातांमध्ये चिकटून राहतात. जे नंतर प्लाक आणि टार्टरचं रूप घेतात.

Yellow Teeth Home Remedy : दात पिवळे होणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. केवळ तंबाखू, गुटखा खाणारे किंवा स्मोकिंग करणारेच नाही तर भरपूर लोक या समस्येनं चिंतेत असतात. ज्यामुळे लोक मोकळेपणाने हसतही नाहीत आणि त्यांचा आत्मविश्वासही डळमळतो. मुळात दातांवर पिवळेपणा येण्याची कारणं वेगवेगळी असतात. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे काही खाल्ल्यावर किंवा प्यायल्यावर काही कणं दातांमध्ये चिकटून राहतात. जे नंतर प्लाक आणि टार्टरचं रूप घेतात.

प्लाक आणि टार्टर या गोष्टी पुढे जाऊन दात पिवळे होण्याचं, सडण्याचं, दुर्गंधीचं, दातांमध्ये वेदना होण्याचं कारण ठरतात. अशात तोंडाची दुर्गंधी घालवायची असेल, दात पांढरे चमकदार करायचे असतील तर यावर एक सोपा घरगुती उपाय करू शकता. 

आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. महत्वाची बाब किचनमधीलच एक गोष्टी ही समस्या दूर करण्यास मदत करते. 

प्लाक आणि टार्टर काय आहे?

प्लाक दातांवरील एक चिकट थर असतो, जेव्हा आपण काही गोड किंवा स्टार्च असलेलं खातो तेव्हा हा थर तयार होतो. यातील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतात, जे दातांवरील थराचं नुकसान करतात. जर वेळीच प्लाक साफ केला नाही तर तो टार्टरचं रूप घेतो. टार्टर टणक असतं. टार्टर ब्रशनं साफ होत नाही. ज्यामुळे हिरड्यांवर सूज, इन्फेक्शन आणि दातांना कीड अशा समस्या होतात.

बेकिंग सोडा रामबाण उपाय

डॉक्टरांनी सांगितलं की, बेकिंग सोडा एक खूप प्रभावी उपाय आहे. यातील अल्कलाईन बॅक्टेरिया द्वारे बनवण्यात आलेलं अ‍ॅसिड न्यूट्रलाइज करतं. बेकिंग सोड्यानं दातांवरील प्लाक आणि टार्टर हळूहळू निघू लागतं. यात अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वही असतात, जे दातांचा बॅक्टेरियापासून बचाव करतात.

कसा कराल वापर?

१ चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्रशवर लावून दाता आणि हिरड्यांवर घासा. २ मिनिटं ब्रश करा. दातांच्या भेगा, आतून-बाहेरून पेस्ट सगळीकडे लागली पाहिजे. हा उपाय आठड्यातून १ ते २ वेळा करा. रोज हा उपाय करू नका. सोबत सामान्य टूथपेस्टनं ब्रश करणं चालूच ठेवा. 

बेकिंग सोड्याचं पाणी

डॉक्टरांनी सांगितलं की, दात चमकदार करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बेकिंग सोड्याचं पाणी. याला डीआयवाय माउथवॉश असंही म्हटलं जातं. हे तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्या १ छोटा चमचा बेकिंग सोडा टाका आणि या पाण्यानं ३० सेकंद गुरळा करा. दिवसातून दोन वेळा असं करा. खासकरून जेवण केल्यावर हा उपाय करावा.

काय काळजी घ्याल?

डॉक्टरांनी सांगितलं की, बेकिंद सोड्याचा वापर दातांवर रोज करू नका. रोज याचा वापर केला तर दातांच्या वरच्या थराचं नुकसान होऊ शकतं. त्याशिवाय बेकिंग सोडा हा टूथपेस्टचा पर्याय नाहीये. दातांसंबंधी समस्या अधिक वाढली असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स