Relief From Piles in 5 Minutes: मूळव्याध म्हणजेच पाइल्स ही एक गंभीर आणि असह्य वेदना देणारी समस्या आहे. जी आपल्या काही चुकांमुळे होते. हे नाजूक जागेचं दुखणं इतकं वाईट असतं की, ना नीट बसता येत ना उभं राहता येत. पाइल्स झाल्यावर टॉयलेट करताना भयानक वेदना होतात, विष्ठेतून रक्त येतं. गुदद्वारात सूज येत, फोड येतात. ज्यामुळे संडास करताना खूप वेदना होतात. या सूजेचं कारण म्हणजे जास्त वेळ एकाच जागी बूसन राहणं, पोट साफ न होणं, जास्तताण देणं, गर्भधारणा किंवा पेल्विक भागावर वाढलेला दाब. पाइल्स झाल्यावर वेदना इतक्या वाढतात की, त्या कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. अशात आज आपण असाच एक उपाय घेऊन आलो आहोत.
वेदना कमी करण्याचा सोपा उपाय
जर पाइल्समुळे वेदना वाढल्या असतील आणि काहीतरी लगेच आराम देणारा उपाय हवा असेल, तर स्टॅनफोर्ड आणि UCLA मध्ये प्रशिक्षित गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. वेंडी यांनी सांगितलेला ५ मिनिटांचा उपाय खूप लोकप्रिय झाला आहे.
डॉ. वेंडी सांगतात की, "जेव्हा गुदद्वारात सूज येते, तेव्हा पाय ५ मिनिटांसाठी वर उचलून ठेवणं हा एक इन्स्टन्ट आणि सोपा उपाय आहे." यासाठी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आपण उपाय बघू शकता.
कसा होईल फायदा?
डॉ. वेंडी सांगतात की, कंबर आणि पाय वर केल्यानं गुदद्वारातील नसांवरील दाब कमी होतो, आणि रक्तप्रवाह गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने हृदयाकडे परत जातो. यामुळे गुदभागातील ताण आणि सूज कमी होते, आणि काही मिनिटांतच वेदनांपासून आराम मिळतो.
National Institutes of Health (NIH) च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत पाइल्स हा चौथा सर्वात सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार आहे. दरवर्षी साधारण 3.3 दशलक्ष लोक यामुळे त्रस्त असतात. भारतातही ही समस्या खूप सामान्य आहे. अंदाजे 50% लोकांना आयुष्यात कधी ना कधी पाइल्स होऊ शकतो.
पाइल्स होण्याची मुख्य कारणे....
- सतत पोट बिघडणं
- एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे
- जास्त वेळ उभं राहणं
- लठ्ठपणा
- अधिक मद्यसेवन
- नैसर्गिक विधीसाठी जोर लावावा लागणं
- फायबरची कमतरता
- आनुवांशिक कारण