Join us

नेहमीच इअरबड्स वापरत असाल तर जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, कान खराब होण्याचा टळेल धोका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:20 IST

Ear Health: अनेकजण कानात सतत इअरबड्स लावून ठेवतात. अशात इअरबड्स जास्त वेळ कानात लावून ठेवल्यानं काय नुकसान होतात याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. 

Ear Health: जगण्याला आता टेक्नॉलॉजीची सवय झाली आहे. कारण प्रत्येक कामासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून कामं सोपी केली जातात. पण टेक्नॉलॉजीनं जीवन सोपं झालं असलं तरी याचे अनेक दुष्परिणामही आहेत. काही अशी उपकरणं असतात जे महत्वाची असतात. पण त्यांचा अधिक वापर करणं घातक ठरू शकतं. असंच एक उपकरण म्हणजे इअरबड्स. गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी आजकाल इअरबड्सचा खूप वापर केला जातो. अनेकजण कानात सतत इअरबड्स लावून ठेवतात. अशात इअरबड्स जास्त वेळ कानात लावून ठेवल्यानं काय नुकसान होतात याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. 

इअरबड्सचे नुकसान

डॉक्टर सौरभ बाली यांनी सांगितलं की, जर तुम्ही नेहमीच इअरबड्स कानात लावून ठेवत असाल तर यानं CSOM, ASOM, कानातून पाणी येणं, कानात आवाज येणं, व्यवस्थित ऐकून न येणं, कान दुखणं अशा समस्या होऊ शकतात. या समस्या होऊ नये यासाठी इअरबड्स कुणाशीही शेअर करू नये. हे अनहायजेनिक असतं. 

इअरबड्स जास्तवेळ एकसारखे कानात लावून ठेवू नये. दर 15 ते 20 मिनिटांनंतर 2 मिनिटांसाठी इअरबड्स कानातून काढावेत.

इअरबड्सचा आवाज फोनच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये.

इअरबड्सचा वापर करण्याऐवजी बाजारातून इअर हेडफोन म्हणजे कानावरून लावता येणारे हेडफोन वापरले पाहिजेत.

कशी घ्याल कानांची काळजी?

कानाचं नुकसान होऊ नये आणि ऐकण्याची क्षमता चांगली रहावी यासाठी टोकदार वस्तू कानाता टाकू नका. कानातील मळ काढण्यासाठी एक्सपर्टची घ्या.

कानाच्या बाहेरील भागांची स्वच्छता नक्की करा. रूई किंवा ओला कापड घेऊन कानाचा बाहेरील भाग स्वच्छ करा.

इअर ड्रॉप्स किंवा तेल टाकल्यानं कान साफ होतात. आठवड्यातून 1 ते 2 वेळा असं करता येईल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स