High Cholesterol Diet: कोलेस्टेरॉल एकप्रकारचं फॅट असतं, जे शरीर तयार करतं. खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींमध्ये कोलेस्टेरॉल असतं. शरीरातील वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात, एक गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी चांगलं असतं, पण बॅड कोलेस्टेरॉलनं मोठं नुकसान होतं. जे कमी करणं सुद्धा बरंच अवघड असतं. अशात वस्कुलर सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन्स स्पेशलिस्ट डॉ. सुमित कपाडिया यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आहारात कोणत्या गोष्टींची समावेश केल्यावर कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं हे सांगितलं.
कोलेस्टेरॉल कशाने होईल कमी?
मेथी
जवळपास सगळ्यांच्याच किचनमध्ये मेथीचे दाणे असतातच. मेथीच्या पिवळ्या दाण्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मेथीमध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असतं, जे खाल्ल्यास कोलेस्टेरॉल गटमध्ये बाइंड होतं आणि शरीर त्याला अॅब्जॉर्ब करू शकत नाही. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खाऊ शकता.
खोबरं
खोबरं वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. हे नेहमी खाल्लं जात नाही, पण काही पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. खोबऱ्यानं शरीरात गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत मिळते. ओलं खोबरं कच्चंच खाल्लं जातं, तर वाळलेलं खोबरं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकलं जातं. कसंही खाल्लं तरी हे शरीरासाठी फायदेशीर असतं. पण जास्त खोबरं खाणंही टाळावं.
भेंडी
भेंडी एक सुपरफूड आहे ज्यात म्यूसिलेज भरपूर असतं. हेच चिकट म्यूसिलेज कोलेस्टेरॉल पकडतं आणि ते आपल्यासोबत शरीरातून बाहेर काढतं.
सफरचंद
पेक्टिन आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स असलेले सफरचंद आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. सफरचंद खाल्ल्यानं लिव्हरचं काम सुधारतं आणि यानं शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल देखील कमी होतं. सफरचंदाऐवजी आपण पेरू आणि आवळेही खाऊ शकता.
लसूण
लसणामध्येही कोलेस्टेरॉल कमी करणारे अनेक गुण असतात. कच्चा लसूण खाल्ल्यानं केवळ बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं असं नाही तर ब्लड प्रेशरही कमी करण्यास मदत मिळते. रोज 1 ते 2 लसणाच्या कच्च्या कळ्या उपाशीपोटी खाव्यात.