Salt Water For Drinking: हेल्थ एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. जर निरोगी रहायचं असेल तर पाणी पिणं खूप महत्वाचं ठरतं. अशात शरीरात पाण्याची लेव्हल नियंत्रिण ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं. कारण जर शरीरात पाणी कमी झालं तर कितीतरी आजारांचा धोका वाढतो. अनेक एक्सपर्ट पाणी पिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा सांगतात. कारण जर पाणी योग्य पद्धतीनं प्यायले नाही तर त्याचे पूर्णपणे शरीराला फायदे मिळत नाही. कोमट पाणी, लिंबू पाणी, हळदीचं पाणी या पद्धती आपण ऐकत असतोच. सोबतच पाण्यात चिमुटभर मीठ (Salt Water) टाकून पिण्याचा देखील सल्ला दिला जातो. पण पाण्यात मीठ टाकून पायल्यानं काय होतं हे अनेकांना माहीत नसतं? याचंच उत्तर डॉ. रोहित माधव साने यांनी दिलं आहे.
पाण्यात मीठ टाकून प्यायल्यास काय होतं?
डॉ. रोहित माधव साने यांच्यानुसार, जर पाण्यात मीठ टाकून प्याल तर याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे पाणी आरोग्यासाठी भरपूर हेल्दी असल्याचं ते सांगतात. त्यांच्यानुसार, आपल्या शरीराची इलेक्ट्रिक सिस्टीम जसे की, हृदयाचे ठोके, मसल्स कॉंट्रॅक्ट होणं आणि नर्व्हना सिग्नल पाठवणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इलेक्ट्रोलाइट बॅलन्सवर डिपेंड असतात. मीठ या बॅलन्ससाठी खूप महत्वाचं असतं.
डॉक्टर सांगतात की, आपण अनुभवलं असेल की, जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. याचं कारण इलेक्ट्रोलाइट्स शिवाय सेल्समध्ये अॅब्जॉर्प्शन होत नाही. सोडिअम पाण्याला सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. यामुळे मायग्रेन आणि एनर्जीत मदत मिळते.
कधी प्यावं मिठाचं पाणी?
जर आपल्या कोणताही हृदयरोग नसेल तर एक्सरसाईजनंतर किंवा शरीरातून जास्त घाम जात असेल तेव्हा पाण्यात चिमुटभर मीठ टाकून प्यावं. असं केल्यानं शरीर लगेच रिचार्ज होतं.
इतरही काही फायदे
शरीर हायड्रेट राहतं
शरीर आतून साफ होतं
घशाला आराम मिळतो
चांगली झोप लागण्यास मदत
वजन कमी करण्यासही मदत मिळते