Lemon and Clove Remedy: लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवतात आणि सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे देतात. त्यात जर या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर फायदे दुप्पट होतात. या फायद्यांबाबत आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी एका यूट्यूब व्हिडिओतून माहिती दिली आहे. चला तर पाहुयात काय होतात फायदे...
डॉक्टर सलीम जैदी सांगतात की, लिंबू आणि लवंग एकत्र केल्यावर एक प्रभावी घरगुती उपाय तयार होतो. रोज उपाशीपोटी या गोष्टी खाल्ल्या तर शरीरात आपल्याला अनेक बदल बघायला मिळतील.
टळतो आजारांचा धोका
डॉक्टर सांगतात की, लिंबामध्ये व्हिटामिन सी आणि सिट्रिक अॅसिड असतं, जे बॅक्टेरिया आणि व्हायरससोबत लढण्यास मदत करतं. लवंगामध्ये यूजिनॉल नावाचं तत्व असतं. जेव्हा लिंबू आणि लवंग एकत्र येतात तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. पावसाळ्यात लवंग वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करते.
पचन सुधारतं
जर आपल्याला नेहमीच पचनासंबंधी समस्या राहते, पोट बरोबर साफ होत नसेल, गॅस होत असेल तर लिंबू आणि लवंगचं कॉम्बिनेशन फायदेशीर ठरू शकतं. या दोन्ही गोष्टींमुळे पोट साफ होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.
जॉइंट्सचं दुखणं होईल दूर
डॉक्टर सांगतात की, लवंग आणि लिंबामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. लवंगातील यूजिनॉलमध्ये सूज कमी करण्याची क्षमता असते. तेच लिंबातील व्हिटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्सनं सूज कमी होते. अशात या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर जॉइंट्समधील वेदना, सूज कमी होण्यास मदत मिळते.
फुप्फुसांसाठी फायदेशीर
लवंग आणि लिंबाच्या चहानं किंवा पाण्यानं घशाला आराम मिळतो आणि रेस्पिरेटरी हेल्थ सुधारते. सर्दी-पडसा, खोकला, घशातील खवखव, श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही या गोष्टींनी मदत मिळते.
कसा कराल वापर?
डॉक्टरांनी सांगितलं की, लवंग आणि लिंबूचा वापर आपणं दोन वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता.
लवंग आणि लिंबाचा चहा
हा खास चहा बनवण्यासाठी १ कप पाण्यात २ ते ३ लवंग टाकून ५ मिनिटं उकडा. पाणी चांगलं उकडल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. हवं तर यात थोडं मधही घालू शकता. हा चहा रोज सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता.
लवंग आणि लिंबाचं पाणी
हे पाणी बनवण्यासाठी १ लीटर पाण्यात एका लिंबाचे तुकडे आणि ५ ते ६ लवंग टाकून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी दिवसभर हे पाणी थोडं थोडं पित रहा.
डॉक्टर सलीम जैदी यांच्यानुसार, प्रेग्नेंट महिला, स्तनपान करणाऱ्या महिला किंवा अॅसिडिटी, ब्लीडिंगची समस्या आहे त्यांनी हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.