Most Unhealthy Foods : आपण काय खातो किंवा पितो या गोष्टींचा आपल्या आरोग्याशी आणि शरीराशी मोठा खोलवर संबंध असतो. शरीराला आवश्यक ते पोषण मिळेल, अशा गोष्टी खाल्ल्या तर शरीराला ताकद मिळेल आणि आजारांपासून बचाव करता येईल. पण जर डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश कराल तर डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आणि मेंदुवर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट नेहमीच पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देत असतात.
हेल्दी फूड कोणते असतात? असा प्रश्न पडला असेल तर ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्ब्स, हेल्दी फॅट, व्हिटामिन, मिनरल्स आणि फायबर असतं, त्यांना हेल्दी फूड्स म्हटलं जातं. या गोष्टींमुळे शरीर आणि अवयवांची काम करण्याची क्षमता वाढते. पण आपल्याला सगळ्यात घातक पदार्थांबाबत माहीत आहे का?हेमाटोलॉजिस्ट डॉक्टर रवि के गुप्ता यांनी १० सगळ्यात अनहेल्दी फूड्सबाबत माहिती दिली आहे.
सगळ्यात घातक १० पदार्थ
धान्यापासून बनलेले नाश्त्यात खाल्ले जाणारे पदार्थ, डाएट सोडा, व्हाइट ब्रेड, फ्रोजन फूड्स, कपमधील नूडल्स, चिप्स, फ्राइज, शुगर असलेले ड्रिंक्स, प्रोसेस्ड मीट, अल्कोहोल हे जगातील १० सगळ्यात घातक पदार्थ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
लठ्ठपणा वाढतो
वरील सगळ्या फूड्समध्ये शुगर, फॅट, कार्ब्स आणि कॅलरी भरपूर प्रमाणात असतात. याच गोष्टी लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात. अशी चरबी शरीरासाठी नुकसानकारक असते आणि अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढवते.
डायबिटीसचा धोका
या फूड्समध्ये आर्टिफिशिअल शुगर असते. ज्यामुळे ब्लड शुगर स्पाइक होते आणि त्यामुळेच पुढे जाऊन डायबिटीस होतो. ज्यांच्या परिवारात आधीच कुणाला डायबिटीस असेल तर त्यांनी हे फूड्स खाणं बंद केलं पाहिजे.
हृदयरोगांचा धोका
या फूड्समध्ये फॅट आणि सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. यानं हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्टेरॉलची समस्या वाढते. कोलेस्टेरॉलनं नसा ब्लॉक होतात. अशात हृदयरोग, हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.