Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फॅटी लिव्हरची लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टर सांगतात, काय काळजी घ्यायची-नेमकं खायचं काय..

फॅटी लिव्हरची लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टर सांगतात, काय काळजी घ्यायची-नेमकं खायचं काय..

Fatty Liver Symptoms: डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलं कशाप्रकारे तुम्ही फॅटी लिव्हरची लक्षणं घरीच ओळखू शकता. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:48 IST2025-06-10T16:44:00+5:302025-06-10T17:48:38+5:30

Fatty Liver Symptoms: डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलं कशाप्रकारे तुम्ही फॅटी लिव्हरची लक्षणं घरीच ओळखू शकता. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

Doctor tells 5 signs of fatty liver you can check at home | फॅटी लिव्हरची लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टर सांगतात, काय काळजी घ्यायची-नेमकं खायचं काय..

फॅटी लिव्हरची लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टर सांगतात, काय काळजी घ्यायची-नेमकं खायचं काय..

Fatty Liver Symptoms: लिव्हरवर फार जास्त फॅट जमा झाल्यानं फॅटी लिव्हरची समस्या होते. ज्या लोकांना डायबिटीस असतो किंवा ज्यांचं वजन जास्त असतं ते लोक नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरनं पीडित असतात. बाहेरचे तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यानं फॅटी लिव्हरची समस्या होते. लिव्हर फॅटी झाल्यावर ते योग्यपणे काम करत नाही. ज्यामुळे सतत थकवा, लिव्हरच्या आजूबाजूला वेदना, आणि अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे अशा समस्या होतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या वेळीच ओळखणं फार महत्वाचं असतं. डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलं कशाप्रकारे तुम्ही फॅटी लिव्हरची लक्षणं घरीच ओळखू शकता. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

फॅटी लिव्हरचे संकेत

- फॅटी लिव्हर झाल्यावर पोटाच्या मधे चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरशी संबंधित इन्सुलिन रेजिस्टेंसमुळे नेहमीच पोटाच्या मधला भाग जाड होऊ लागतो.

- नेहमीच थकवा जाणवणे फॅटी लिव्हरमुळे होऊ शकतं. थकवा आणि आळस सतत राहत असेल तर याचा अर्थ लिव्हरची समस्या असू शकते.

- उजव्या बाजूला छातीच्या खाली वेदना होत असेल तर हा फॅटी लिव्हरचा संकेत असू शकतो. याचा अर्थ लिव्हरमध्ये सूज आहे.

- इन्सुलिन रेजिस्टेंसमुळे चेहऱ्यावर अॅक्ने, त्वचा काळवंडणे आणि केसगळती अशाही समस्या होऊ शकतात.

- भूक न लागणे आणि मळमळ होणं सुद्धा फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं. याचा अर्थ असाही लिव्हरवर अधिक दबाव पडत आहे.

काय खाऊ नये?

डॉ. सेठी म्हणाले की, जर तुम्हाला लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर फ्रुक्टोस असलेल्या शुगरी ड्रिंक्सचं सेवन बंद करा.

प्रोसेस्ड स्नॅक्स लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याचं एक मुख्य कारण आहे. त्याऐवजी हेल्दी नट्स आणि बिया खाव्यात.

सोयाबीन, कॉर्न आणि सनफ्लॉवर ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतं. या तेलांचा वापर जर अधिक केला गेला तर ओमेगा-३ इन्फ्लामेश आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस वाढू शकतो.

बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील ज्यूसमध्ये भरपूर फ्रुक्टोस असतं आणि यांमध्ये फायबर कमी असतं. ज्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते. यानं लिव्हरची समस्या वाढू शकते.
 

Web Title: Doctor tells 5 signs of fatty liver you can check at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.