Join us

रोज नाहीच, आठवड्यातून एकदा खा 'या' ४ गोष्टी; लिव्हर राहील फिट, टळेल गंभीर आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:38 IST

Healthy Food For Liver : आहारात काही गोष्टींचा समावेश करून लिव्हर तुम्ही हेल्दी ठेवू शकता. जर तुम्ही खाली दिलेल्यांपैकी गोष्टी रोज खात नसाल आणि आठवड्यातून एकदाही खाल तर तुम्हाला फायदा मिळू शकता.

Healthy Food For Liver : लिव्हरच्या समस्या आजकाल खूप जास्त वाढत आहेत. अनहेल्दी खाणं आणि अनहेल्दी लाइफस्टाईल या दोन गोष्टी यासाठी कारणीभूत मानल्या जातात. एका अंदाजानुसार जगभरात २ मिलियनपेक्षा जास्त लोकांचा जीव लिव्हरसंबंधी आजारामुळे जातो. गेल्या काही वर्षात मेट्रो सिटीजमध्ये लोक जास्तकरून फॅटी लिव्हरचे शिकार होत आहेत. लिव्हरमध्ये जर काही गडबड झाली तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. जर वेळीच लक्ष दिलं नाही तर लिव्हर फेलही होऊ शकतं. अशात लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. आहारात काही गोष्टींचा समावेश करून लिव्हर तुम्ही हेल्दी ठेवू शकता. जर तुम्ही खाली दिलेल्यांपैकी गोष्टी रोज खात नसाल आणि आठवड्यातून एकदाही खाल तर तुम्हाला फायदा मिळू शकता.

लिव्हर स्पेशलिस्ट आणि लोकांना सोशल मीडियावरून आरोग्याबाबत माहिती देणारे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, आठवड्यातून एकदा या ४ गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. लिव्हर स्पेशलिस्ट असल्यानं ते स्वत:ही या गोष्टी खातात. 

लिव्हरसाठी फायदेशीर फूड्स

खजूर आणि अक्रोड 

खजूर लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खजूरांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. तुम्ही यासोबत अक्रोड खाऊ शकता. यातून शरीराला ओमेगा-३ फॅटी अॅसिड मिळेल. या दोन्ही गोष्टी एकत्र स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. यानं लिव्हर फिट आणि निरोगी राहील.

मिक्स नट्ससोबतच डार्क चॉकलेट

मिक्स नट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातून शरीराला आवश्यक व्हिटामिन्स आणि फॅट्स मिळतात. नट्स खाऊन व्हिटामिन ई मिळतं. जे लिव्हरसाठी खूप फायदेशीर असतं. जर यात तुम्ही डार्क चॉकलेट टाकून खाल तर अधिक फायदा मिळेल.

मध, सफरचंद आणि दालचीनी

मध, सफरचंद आणि दालचीनी या तिन्ही गोष्टी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सच्या पावर हाऊस आहेत. सफरचंद स्मॅश करून त्यात मध टाका. त्यावर थोडं दालचीनी पावडर टाका. यानं गट हेल्थ आणि लिव्हर दोन्हींना फायदा मिळतो. 

ग्रीक योगर्ट किंवा दह्यासोबत बेरीज

योगर्ट लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असलेल्या बेरीज यात टाकून खाल तर लिव्हरचं आरोग्य सुधारतं. तुम्ही ग्रीक योगर्टच्या जागी दह्याचाही वापर करू शकता. यानं पोट आणि लिव्हरचं आरोग्य चांगलं राहतं.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य