Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत 

Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत 

How To Reduce The Risk Of Cancer: कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कोणकोणते खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात..(doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 16:07 IST2025-06-24T16:06:00+5:302025-06-24T16:07:09+5:30

How To Reduce The Risk Of Cancer: कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कोणकोणते खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात..(doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer)

doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer, how to reduce the risk of cancer | Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत 

Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत 

Highlightsकॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ नियमितपणे असायला हवे?

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायलाच हवेत. निरोगी जीवनशैली आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवू शकते, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. म्हणूनच आता आपण असे काही पदार्थ पाहूया जे पदार्थ कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतात. त्यामुळे ते पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे.(doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer)

 

कॅन्सरचा धोका कमी करणारे पदार्थ कोणते?

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ नियमितपणे असायला हवे, याविषयीची माहिती दिल्ली येथील डॉ. अमन रस्तोगी यांनी नवभारत टाईम्सला दिली आहे.

रातराणीच्या रोपाला फुलांचा बहर येण्यासाठी ३ गोष्टी!  मंद, धुंद सुगंधाने भरून जाईल घर.. 

यामध्ये डाॅक्टर असं सांगतात की असा काेणताच पदार्थ नाही, जो खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होणारच नाही, याची पुर्ण हमी मिळेल. पण काही पदार्थ निश्चितच असे आहेत की जे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. ॲण्टीऑक्सिडंट्स असणारे फळं, भाज्या, सुकामेवा आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायला हवा. 

 

तसेच ब्रोकोली, पत्ताकोबी अशा व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असणाऱ्या भाज्या, टोमॅटो, गाजर अशा लाल भाज्या, कांदा, लसणू असे पांढरे पदार्थ, वांगं, ब्लूबेरी, मनुका असे निळे, जांभळे पदार्थ खावेत.

Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

जेवढे रंगबेरंगी पदार्थ आपल्या आहारात असतील तेवढे आपल्या तब्येतीसाठी  चांगले असतात. कॅन्सर होऊ नये म्हणून असं कोणतंही सुपरफूड नाही. पण सगळेच पौष्टिक पदार्थ थोडे थोडे आपण नियमितपणे खात गेलो तर त्याचा शरीरावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. 
 

Web Title: doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer, how to reduce the risk of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.