Join us
Daily Top 2 Weekly Top 5

२५-३० किलो वजन कमी करायचं तर काय करायला हवं? डॉक्टर सांगतात, डाएट आणि व्यायामाचं सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:56 IST

एका व्यक्तीनं कोणत्याही औषधाशिवाय ६ वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने २७ किलो वजन कमी केले.

सध्याच्या काळात लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे. वाढत्या वजनामुळे सध्या बरेच लोक त्रस्त आहेत आजच्या धावपळीच्या जगात लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट किंवा जादुई गोळ्यांच्या शोधात असतात. हैदराबादमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एका अशा रुग्णाची गोष्ट शेअर केली आहे. एका व्यक्तीनं कोणत्याही औषधाशिवाय ६ वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने २७ किलो वजन कमी केले. (Doctor shares How he Lost 27 Kg in 6 Years Weight Loss Transformation Secret Tips)

 डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये या व्यक्तीचे वजन १०० किलो होते. केवळ वजनच जास्त नव्हते, तर त्यांचे वैद्यकीय अहवालही चिंताजनक होते. त्यांची कंबर ९६ सेंमी होती, ट्रायग्लिसराइड्स ३०० च्या धोकादायक पातळीवर होते आणि बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) १५० पर्यंत पोहोचले होते. तसेच ते 'प्री-डायबिटीज'च्या उंबरठ्यावर होते.

मात्र, २०२६ मध्ये जेव्हा त्यांचे पुन्हा परीक्षण करण्यात आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ६ वर्षांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे त्यांचे वजन आता ७३ किलो झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा महागडी औषधे न घेता हे साध्य केले. आता त्यांना मधुमेहाचा धोका नाही आणि त्यांचे कोलेस्ट्रॉल देखील पूर्णपणे नियंत्रणात आहे. डॉक्टरांनी सांगितले की, या यशामागे कोणतेही गुपित नसून केवळ ४ साध्या नियमांचे प्रामाणिक पालन आहे:

१. रनिंग त्या व्यक्तीने आठवड्यातून साधारण ४ ते ५ तास धावण्यास सुरुवात केली. चरबी जाळण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम ठरला. २. स्ट्रेंथ ट्रेनिंग केवळ धावणे पुरेसे नव्हते, तर आठवड्यातून २ ते ३ दिवस त्यांनी जिममध्ये वजन उचलून व्यायाम केला, ज्यामुळे स्नायू (Muscles) मजबूत झाले. ३. पुरेशी झोप वजन कमी करण्याच्या प्रवासात झोप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी दररोज ७ ते ८ तास शांत झोप घेण्यावर भर दिला. ४. योग्य आहार आहारात कोणतेही टोकाचे बदल न करता 'सातत्य'  ठेवले. घरचे साधे जेवण आणि जंक फूडपासून पूर्णपणे लांब राहणे हा त्यांच्या डाएटचा मुख्य भाग होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's Diet Plan for 27kg Weight Loss: Quick Weight Loss Tips

Web Summary : A man lost 27kg in 6 years without medication by following a disciplined lifestyle. Key changes included running, strength training, sufficient sleep (7-8 hours), and a consistent, healthy diet avoiding junk food. His cholesterol and diabetes risk significantly improved.
टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स