Join us

बाथरूममधून लगेच बाहेर फेका रोजच्या वापरातील 'या' 3 गोष्टी, डॉक्टरांनी सांगितली कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:33 IST

Toxic Bathroom Items in Bathroom: बाथरूममध्ये असे काही प्रोडक्ट्स जे वेळीच बदलले नाहीत तर हळूहळू बॅक्टेरियांचा अड्डा बनतात. अशाच काही 3 गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Toxic Bathroom Items in Bathroom: बाथरूमचा संबंध आपली स्वच्छता आणि आरोग्याशी असतो. स्वच्छतेसंबंधी अनेक गोष्टीही आपण बाथरूममध्ये ठेवत असतो. पण यातील काही गोष्टी अशाही असतात, ज्या आपल्या आरोग्याचं नुकसान करतात. बाथरूममध्ये असे काही प्रोडक्ट्स जे वेळीच बदलले नाहीत तर हळूहळू बॅक्टेरियांचा अड्डा बनतात. अशाच काही 3 गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

याबाबत फेमस हार्वर्ड डॉक्टर सौरभ सेठी यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे. डॉक्टर म्हणाले की, बाथरूममध्ये असलेल्या काही कॉमन गोष्टी वेळेनुसार इन्फेक्शन, त्वचेची समस्या आणि इतरही काही समस्यांचं कारणं ठरतात. चला तर जाणून घेऊ या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.

टूथब्रश

बाथरूममधील घातक गोष्टींच्या यादीत सगळ्यात वरचा नंबर टूथब्रशचा येतो. डॉक्टर सेठी म्हणाले की, टूथब्रश आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. पण हाच ब्रश तीन महिन्यांपेक्षा जास्त जुना होतो, तेव्हा घातक बॅक्टेरियाचं घर बनतो. डॉक्टरनुसार, तुमच्या बाथरूममध्ये तीन महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश असेल, तर लगेच फेका. अशा टूथब्रशमध्ये हजारोंच्या संख्येने बॅक्टेरिया असतात, जे ब्रश करताना आपल्या तोंडात जातात. ज्यामुळे हिरड्यांवर सूज, श्वासांची दुर्गंधी आणि इन्फेक्शनचा धोका असतो. 

डल रेझर ब्लेड

महिला आणि पुरूष दोघेही रेझर ब्लेडचा वापर शेव्हिंगसाठी करतात. पण एक-दोनदा वापरल्यानं हे रेझर ब्लेड डल होतात. अशात यांचा वापर करणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. पुन्हा पुन्हा त्याच त्याच रेझरचा वापर केल्यानं स्किन इरिटेशन आणि इन्फेक्शनचा धोका असतो. डॉक्टर सांगतात की, रेझर ब्लेड 5 ते 7 वेळा वापरल्यावर बदलून टाका.

अ‍ॅंटी मायक्रोबिअल माउथवॉश

अ‍ॅंटी-मायक्रोबिअल माउथवॉश लोक तोंडाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर करण्यासाठी वारतात. पण डॉक्टर सेठी हे माउथवॉश बाथरूममधून फेकण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनुसार, अ‍ॅंटी- मायक्रोबिअल माउथवॉश तोंडातील नॅचरल बॅक्टेरियाचा बॅलन्स बिघडू शकतो. यानं गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. जे तोंडासाठी खूप फायदेशीर असतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स