Healthy Tips: कंबरदुखी ही एक गंभीर समस्या आहे. पुरूषांपेक्षा जास्त महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. चुकीच्या पद्धतीने बसणे, सतत बसणे, जास्तवेळ उभे राहून काम करणे या कारणांमुळे ही कंबरदुखी होते असं सामान्यपणे सांगितलं जातं. पण कंबरदुखीचं एक वेगळं कारणही समोर आलं आहे. ज्याबाबत आपणं कधी विचारही केला नसेल. तेच पाहुयात.
न्यूरोसर्जन डॉक्टर अरुण एल नायक यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, डिहायड्रेशन आणि कंबरदुखी यांच्यात काय संबंध आहे. अशात पाहुयात की, शरीरात पाणी कमी झाल्यावर कंबरदुखीची समस्या होऊ शकते की नाही.
पाणी कमी झाल्यानं कंबर दुखते का?
डॉक्टर अरूण नायक यांनी सांगितलं की, कंबरेच्या खालच्या भागात दुखत असेल तर याला केवळ चुकीच्या पद्धतीनं बसणे हेच कारण असेल असं नाही. याचं कारण शरीरात पाणी कमी होणं हेही असू शकतं. स्पाइन डिस्क ९० टक्के पाण्यापासून बनली असते आणि जेव्हा शरीरात डिहायड्रेशन होतं तेव्हा कुशनिंग कमी होते आणि कंबरेत दुखू लागतं. हलक्या-फुलक्या डिहायड्रेशननं सुद्धा स्नायू आखडतात आणि कंबरदुखी वाढते.
डिहायड्रेशन कसं दूर कराल?
डिहायड्रेशनमुळे होणारा कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्ला पाणी प्या.
दिवसभर सुद्धा भरपूर पाणी प्यावं आणि एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी थोडं थोडं करून प्यावं.
दिवसभरात कमीत कमी ३ लीटर पाणी प्या. जर घाम जास्त असेल किंवा एक्सरसाईज करत असाल तर पाण्याचं प्रमाण वाढवा.
कंबरदुखी कशी दूर कराल?
शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण होईपर्यंत कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. थंड किंवा गरम पाण्यानं पाठ आणि कंबर शेका. यानं १० ते २० मिनिटात आपल्याला आराम मिळू शकेल.
हलका व्यायाम करूनही आपणं कंबरदुखी दूर करू शकता. योगा, स्वीमिंग, वॉक या गोष्टींची रूटीनमध्ये समावेश करा.
हेल्दी आहार घ्या आणि अॅक्टिव रहा. एकाच जागी झोपेून किंवा बसून राहू नका. फार जास्त टाइट कपडे घालू नका. सैल आणि आरामदायक कपडे वापरा.