Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हाताना नेहमीच झिणझिण्या येतात, हात सुन्न होतात का? जाणून घ्या काय असतात याची कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:08 IST

Tingling In Hands Causes: नसांवर दबाव पडतो किंवा रक्त पुरवठा काही वेळासाठी खंडीत होतो. ज्यामुळे झिणझिण्या येतात. ही समस्या का होते हे अधिक सविस्तरपणे समजून घेऊ.

Tingling In Hands Causes : हाताला झिणझिण्या येणं किंवा हात सुन्न होणं ही अनेकांमध्ये आढळणारी एक कॉमन समस्या आहे. अनेकदा काही काम करताना अचानक हाताला झिणझिण्या येतात किंवा मग रात्री झोपेत असा प्रकार घडतो. गंभीर बाब ही आहे की, जास्तीत जास्त लोक ही सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करतात. साधारणपणे अशी समस्या आपण चुकीच्या पोजिशनमध्ये झोपल्याने होते किंवा जास्त एकाच स्थितीत हात ठेवल्याने होते. अशात नसांवर दबाव पडतो किंवा रक्त पुरवठा काही वेळासाठी खंडीत होतो. ज्यामुळे झिणझिण्या येतात. ही समस्या का होते हे अधिक सविस्तरपणे समजून घेऊ.

नेहमीच होत असेल तर घातक

एखाद्या वेळी ही समस्या झाली तर हरकत नाही. पण जर हाताला झिणझिण्या नेहमीच येत असतील, जास्त वेळ हात सुन्न राहत असेल तर यामागे आणखीही काही कारणं असू शकतात. theheartysoul च्या रिपोर्टनुसार, हाताला झिणझिण्याच्या येण्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे कार्पल टनल सिंड्रोम, ज्यात मनगटाची नस दबते आणि त्यामुळे अंगठा किंवा बोटांमध्ये झिणझिण्या येतात किंवा वेदना होतात. कधी कधी ही समस्या मनगटात नाही तर हाताचा कोपरा किंवा मानेसंबंधीही असू शकते. नसांमध्ये कुठेही दबाव आला तर त्याचा प्रभाव हातांवर दिसतो. 

ब्लड सर्कुलेशन आणि डायबिटीस

हाताला झिणझिण्या येण्याचं आणखी एक कारण म्हणजे ब्लड सर्कुलेशन सुरळीत नसणे. थंडीत अचानक तापमान बदलल्यामुळे बोटे सुन्न होऊ शकतात आणि त्यांचा रंगही बदलू शकतो. ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्याशिवाय डायबिटीसचा देखील नसांवर प्रभाव पडतो. जेव्हा नसा कमजोर होऊ लागतात, तेव्हा हात - पायांना झिणझिण्या येतात, जळजळ होते आणि हात सुन्न होतात.

व्हिटामिन B12 कमी

हाताला झिणझिण्या येण्याच्या मुख्य कारणांमध्ये व्हिटामिन B12 ची कमतरता हेही आहे. अनेकदा लोक सततचा थकवा किंवा कमजोरीकडे दुर्लक्ष करतात. पण या समस्या शरीरात पोषक तत्व कमी असण्याकडे इशारा करतात. काही केसेसमध्ये थायरॉइडच्या समस्येमुळेही हाताना झिणझिण्या येतात. शरीराचं मेटाबॉलिज्म बिघडल्याने नसांवर प्रभाव पडतो आणि ही समस्या वाढते.

आणखी एक कारण...

खांदे आणि मानेच्या मधील नसा किंवा ब्लड वेसल्सवर दबाव पडल्याने सुद्धा हाताना झिणझिण्या येऊ शकतात. खासकरून जास्त वेळ हात वर उचलून धरल्याने किंवा काही जड उचलल्याने. जर झिणझिण्यासोबत कमजोरी, वेदना जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हा नसांवर दबाव पडत असल्याचा संकेत असू शकतो किंवा एखादी गंभीर समस्याही असू शकते. अचानक हात सुन्न होणे, बोलण्यास अडचण येणे किंवा चक्कर येणे या स्थिती स्ट्रोकच्या संकेत असतात. अशावेळी लगेच डॉक्टरांना भेटा.

English
हिंदी सारांश
Web Title : Tingling hands? Numbness? Know the causes and when to worry.

Web Summary : Frequent hand tingling or numbness can indicate carpal tunnel syndrome, diabetes, or vitamin B12 deficiency. Poor blood circulation and thyroid issues may also contribute. Seek immediate medical attention for sudden numbness, speech difficulties, or dizziness, as these could signal a stroke.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स