Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दालचिनीचा वापर फक्त सुगंधासाठीच करता? रोजच्या आहारात करा समावेश, सुगंधासोबत पोषणही जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 13:29 IST

Do you use cinnamon just for its aroma? Include it in your daily diet, it also has amazing nutrition : दालचिनी आरोग्यासाठी एकदम फायद्याची. पाहा कशी वापरावी.

दालचिनी ही आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी असा मसाल्याचा पदार्थ आहे. सुगंध आणि खास चव देणारी दालचिनी केवळ पदार्थांची चव वाढवत नाही, तर शरीराच्या अनेक तक्रारींवर नैसर्गिक उपाय म्हणूनही उपयुक्त ठरते. आयुर्वेदात दालचिनीला औषधी महत्त्व आहे. (Do you use cinnamon just for its aroma? Include it in your daily diet, it also has amazing nutrition.)दालचिनीमध्ये अनेक महत्त्वाची पोषणतत्त्वे आढळतात. त्यात अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. दालचिनीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि थोड्या प्रमाणात झिंकही असते. तसेच त्यामध्ये सिनामाल्डिहाइड हे सक्रिय घटक असते. जे दालचिनीचे औषधी गुण वाढवते. हे घटक दाह कमी करण्यास, जंतुसंसर्ग रोखण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.

आहारात दालचिनीचा समावेश करणे अतिशय सोपे आहे. रोजच्या चहा किंवा काढ्यात दालचिनीचा छोटा तुकडा घालता येतो. दूध गरम करताना थोडीशी दालचिनी पावडर घातल्यास दूध अधिक पचायला हलके जाते आणि चवही छान लागते. भाजी, उसळ, डाळ किंवा पुलावासारख्या पदार्थांमध्ये दालचिनीचा वापर केल्यास पदार्थाचा सुगंध वाढतो. काही जण सकाळी कोमट पाण्यात दालचिनी उकळून ते पाणी पितात, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गोड पदार्थांमध्ये, ओट्स, पोहे किंवा फळांच्या सॅलेडवरही थोडी दालचिनी पावडर भुरभुरता येते. आहारात दालचिनीचा समावेश करुन घेणे अगदीच सोपे आहे. 

दालचिनी अनेक आरोग्यविषयक समस्यांवर उपयुक्त ठरते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास ती मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी दालचिनी फायदेशीर मानली जाते. तिचे दाहशामक आणि जंतुनाशक गुण सर्दी, खोकला, घसा दुखणे यांसारख्या तक्रारींवर उपयोगी ठरतात. दालचिनी पचनसंस्थेला चालना देऊन गॅस, पोटफुगी आणि अपचन यावर चांगला परिणाम करते. त्यामुळे आहारात नक्की असावी. 

हृदयाच्या आरोग्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे. ती रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास हातभार लागतो. वजन नियंत्रणाच्या दृष्टीनेही दालचिनी फायदेशीर ठरते, कारण ती पचनाची क्रिया सक्रिय ठेवण्यास मदत करते आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी करते. थोडक्यात सांगायचे तर, दालचिनी ही चव आणि आरोग्य यांचा उत्तम संगम आहे. मर्यादित प्रमाणात आणि नियमितपणे आहारात दालचिनीचा समावेश केल्यास पचन, साखर नियंत्रण, प्रतिकारशक्ती आणि एकंदर आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Cinnamon: More than aroma; boost health with daily diet.

Web Summary : Cinnamon offers flavor and numerous health benefits. Rich in antioxidants and minerals, it aids digestion, manages blood sugar, and supports heart health. Incorporate it into tea, milk, or meals for enhanced well-being.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडीआहार योजना