'लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे' ही म्हण वर्षानुवर्षे वापरली जात आहे. मात्र रात्री उशीरा झोपण्याची सवय आजकाल अनेकांच्या आयुष्याचा भाग झाली आहे. २ आणि ३ वाजता झोपणे म्हणजे अगदी सामान्य झाले आहे. मोबाइलवर स्क्रोलिंग करणे, टीव्ही मालिका पाहणे, अभ्यास किंवा ऑफीसचे काम पूर्ण करणे अशा कारणांमुळे लोक २-३ वाजेपर्यंत जागतात. (Do you sleep late at night? This habit increases the risk of serious diseases, one habit causes permanent disease)मात्र ही सवय शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरते. वेळेवर न झोपल्यामुळे शरीराचा सर्केडियन रिदम बिघडते आणि त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
झोप ही केवळ विश्रांती नाही, तर शरीराच्या दुरुस्तीची वेळ असते. आपण झोपेत असताना मेंदू दिवसभरातील ताणतणाव कमी करतो, डोक्यालाही आरामामाची गरज असतेच. शरीराच्या कामकाजासाठी तयार होण्यासाठी मेंदूला काही प्रक्रिया कराव्या लागतात. उशीरा झोपल्यास ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, परिणामी सकाळी उठल्यावर थकवा, डोकेदुखी, लक्ष केंद्रित न होणे आणि चिडचिडेपणा जाणवतो. झोपेअभावी 'कॉर्टिसोल' या हार्मोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे चिंता आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. मानसिक त्रास होतात.
रात्री वेळेत झोप न घेतल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे वजन वाढणे, पोटाभोवती चरबी साचणे व मधुमेहाचा धोका निर्माण होतो. रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, त्यामुळे वारंवार सर्दी, थकवा किंवा इतर आजार होतात. त्वचाही निस्तेज दिसते आणि चेहऱ्यावर काळी वर्तुळे दिसू लागतात. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स वाढतात.
याउलट, वेळेत झोप घेतल्यास शरीराला पूर्ण विश्रांती मिळते, मेंदू कार्यरत राहतो आणि मन शांत राहते. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ ही झोपेची आदर्श वेळ मानली जाते. या वेळेत मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन जास्त प्रमाणात स्रवतो, जो झोप उत्तम करतो आणि शरीराला ऊर्जा देतो.
म्हणूनच रात्री उशीरा जागण्याची सवय हळूहळू सोडावी. झोपेपूर्वी मोबाईलचा वापर कमी करावा, हलके जेवावे आणि शांत वातावरण तयार करावे. वेळेत झोप घेणे ही केवळ चांगली सवय नसून दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. झोप चांगली घ्यायलाच हवी. त्यामुळे झोपेची टाळाटाळ न करता वेळेत झोपा आणि लवकर उठा.
Web Summary : Sleeping late disrupts the body's rhythm, causing fatigue, headaches, and increased stress. It impairs insulin function, raising diabetes risk and weakening immunity. Prioritizing timely sleep, ideally 10 PM to 6 AM, is crucial for long-term health and well-being.
Web Summary : देर से सोने से शरीर का ताल बिगड़ता है, थकान, सिरदर्द और तनाव बढ़ता है। यह इंसुलिन फंक्शन को बिगाड़ता है, जिससे मधुमेह का खतरा बढ़ता है और प्रतिरक्षा कमजोर होती है। समय पर सोना, खासकर रात 10 बजे से सुबह 6 बजे तक, दीर्घकालिक स्वास्थ्य के लिए जरूरी है।