Join us

तुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? हे डाग म्हणजे आजार की गंभीर आजाराची लक्षणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 13:32 IST

Do you have white spots on your nails? These spots are a sign of illness, read to learn more : नखावरचे पांढरे डाग तसे सामान्यच. मात्र सतत उठत असतील तर पाहा काय कारणे असतात.

शरीराचा प्रत्येक अवयव शरीरातील कोणत्या ना कोणत्या बदलाला प्रतिसाद देत असतो. कोणत्याही अगदी हात, पाय, कान , नाक, डोळे सगळेच अवयव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. (Do you have white spots on your nails? These spots are a sign of illness, read to learn more )एवढेच काय तर नखेही आपल्याला शरीराच्या काही क्रियांबद्दल माहिती देतात. नखांवर पडणारे पांढरे डाग म्हणजेच 'ल्यूकोनीशिया' ही एक सामान्य शारीरिक अवस्था आहे. जी बऱ्याच वेळा अजिबात त्रासदायक नसते. मात्र अनेक वेळा हे डाग शरीरातील काही अंतर्गत त्रासांचे, पोषणतत्वांच्या कमतरतेचे किंवा आजारपणाचे लक्षणही असू शकतात. काही सामान्य कारणे असतात, ज्यामुळे हे डाग नखांवर दिसतात. 

१. एखाद्या जुन्या त्रासामुळे नखावर असे डाग उठतात. त्याची काळजी करण्याची आवश्यकता नसते. आधी काही त्रास असतील जे आता नाहीत अशाही काही त्रासांची खूण म्हणून असे डाग उठतात. त्यामुळे अनेकांच्या एकातरी  नखावर लहानसा पांढरा डाग असतो. त्याचे कारण हेच आहे.  ओके  २. एकाच नाही जास्त नखांवरही असे डाग असतात. एकाच नखावर एकाहून अधिक डागही असू शकतात. असे सारखे बरेच डाग उठत असतील तर त्याचा अर्थ शरीरात झिंकची कमतरता आहे असा होतो. शरीरातील झिंकची पातळी कमी झाल्यावर असा त्रास होतो. नखे पांढरी पडतात. 

३. शरीरातील लोह कमी झाल्यावरही नखे पांढरी होतात. मात्र त्याचे डाग जास्त तीव्र न होता, नखे पातळ आणि दबलेली दिसायला लागतात. नखे मऊ होतात. शरीरातील लोह वाढवण्याची गरज आहे याचा हा संकेत असतो. 

४. मात्र नखे पांढरी पडून कमकुवत झाली आरामात तुटू लागली तर मग त्यामागे थायरॉईड सारखे त्रास असू शकतात. नख आरामात वाकत असेल तरी शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.  

     ५. नखे पिवळी पडून तुटायला लागली तर फंगल इन्फेक्शन असू शकते. नखे फार खराब दिसायला लागतात. तुटतातही आणि खराबही होतात. एका नखाला असे झाल्यावर इतरही नखांना होते. त्यामुळे वेळीच उपाय करावेत. 

६. नख मऊ होणे, तुटणे, नखावरचे पांढरे डाग असे सारे आपल्या एका वाईट सवयीमुळेही होते. अनेकांना नखेच चावायची सवय असते. त्यामुळेही नखे कमकुवत होतात.   

टॅग्स : आरोग्यत्वचेची काळजीहेल्थ टिप्ससोशल व्हायरल