आहार हा परिपूर्ण असला पाहिजे. रोजच्या आहारात पोषण भरभरुन असले पाहिजे. (Do you get tired quickly no matter what you do? Eat these 5 foods regularly, you won't be tired)सगळीच पोषण सत्वे रोजच्यारोज मिळवता येत नाहीत. मात्र शरीराला रोजच्या रोज लागणाऱ्या ऊर्जेची सोय तर करायलाच हवी. तसे न केल्यास विविध त्रास होतात. आहार योग्य घेतल्यावरही मात्र दिवसभर काम केल्यावर अनेकदा थकवा जाणवतो. शरीराची बॅटरी लो झाली असे आपण मजेत म्हणतो. मात्र थकवा आल्यावर काहीच काम करावेसे वाटत नाही. थकवा असतानाही काम केल्यामुळे आजारपण येऊ शकते.
१. अगदी साधा पर्याय आहे तो म्हणजे पाणी. उन्हाळ्यात तर पाणी भरपूर प्यायले जाते. मात्र पावसाळा आणि हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. पावसाळ्यातही तहान कमी लागते. त्यामुळे स्वतःला पाणी पिण्यासाठी सतत आठवण करत राहा. दिवसभरात किती पाणी प्यायचे याचे टार्गेट ठेवा आणि तेवढे पाणी प्यायचा प्रयत्न करा. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर थकवा जाणवायला लागतो.
२. शरीरातील थकवा घालवण्यासाठी आहारात काही पदार्थ असायलाच हवेत. जेवताना नाही तर काही तासांनी एखादा पदार्थ खाणे ऊर्जादायी ठरते. मात्र त्यासाठी कोणतेही पदार्थ चालत नाहीत. काही पदार्थ आहेत जे थकवा येऊच देत नाहीत.
३. तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल आहारात ओट्स घ्यायला सुरवात करा. नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा जेवताना वाटीभर ओट्सचा एखादा पदार्थ घ्यायचा. ते फायबर आणि जीवनसत्त्व बी याने परिपूर्ण असतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी ऊर्जा देतात.
४. रताळी खाणे फार उपयुक्त ठरते. या भाजीत भरपूर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. फायबरने भरलेले असे रताळे खाल्यावर शरीरातील ऊर्जा वाढते आणि थकवा जाणवत नाही. त्यामुळे रताळ्याची भाजी, काप, उकडलेली रताळी आहारात असू द्या.
५. पाले भाज्या खाणे फार पौष्टिक असते. थकवाही दूर होतो. त्यामध्ये भरपूर लोह आणि मॅग्नेशियम असते.त्यामुळे या भाज्या थकवा कमी करण्यात मदत करतात. पाले भाज्या खाण्याचे प्रमाण कमी असेल तर ते वाढवा. विविध पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.