Heartburn Home Remedies : काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अॅसिडच्या बॅक फ्लोला अॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू शकत नाही.
हार्टबर्नची कारणं
१) जेव्हा तुम्ही लेटता तेव्हा गुरूत्वाकर्षण पोटातील अॅसिडला खाली ठेवण्यास मदत करत नाही. ज्यामुळे अॅसिड अन्ननलिकेत सहजपणे परत जातं.
२) झोपण्याआधी जड आणि जास्त जेवण केल्यास पचनक्रिया स्लो होते. ज्यामुळे पोटाला आतील गोष्टी रिकाम्या करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अॅसिड रिफ्लक्सची समस्या होते.
कशी दूर कराल समस्या?
१) पपई खावी. पपईने अॅसिडीटी कमी होते. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असतं, जे पचनक्रिया सुधारतं. तसेच यातील फायबर तत्वांमुळे पोटातील टॉक्सिन्स बाहेर काढले जातात. जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या नेहमी होत असेल तर पपईचा डाएटमध्ये समावेश करा.
२) नारळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि शरीरासाठी हे एक चांगलं डिटॉक्सिफिकेशन म्हणून काम करतं. जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची आणि अॅसिडिटीची समस्या असेल नारळाचं पाणी सेवन करा.
३) दही पोटाला थंड ठेवतं. दह्यात नैसर्गिक बॅक्टेरिया असतात. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच हे बॅक्टेरिया पोटात अॅसिड तयार होऊ देत नाहीत. त्यामुळे दही सुद्धा फायद्याचं ठरतं.
४) ही समस्या दूर करण्यासाठी आलं सुद्धा औषधी म्हणून वापरलं जातं. यानेही गॅस कमी करून अॅसिडिटीपासून आराम मिळतो. छातीत जळजळ होत असेल तर आल्याचा चहा घेऊ शकता.
५) बडीशेप खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली होते आणि अॅसिडचं उत्पादन नियंत्रित होतं. जेवण केल्यावर बडीशेप चावून खाल्ल्यास छातीतील जळजळ लगेच कमी होते. यानं पोट शांत होतं आणि जळजळ दूर होते. रोज जेवण झाल्यावर नियमितपणे बडीशेप खाल तर ही समस्या होणार नाही.
६) बेकिंग सोडा अॅसिडला न्यूट्रल करतो आणि पोटातील जळजळ कमी करतो. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून प्यायल्यास जळजळ कमी होईल. फक्त हा उपाय नेहमी नेहमी करू नका. कारण यानं पोटातील अॅसिड अधिक कमी होतं.
७) केळी खाणंही पोटासाठी हेल्दी असतं. यातील असलेले इन्फ्लामेटरी तत्व आतड्यांना येणारी सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच केळ्यात असलेलं फायबर हे निश्चित करतं की, आतड्यांची क्रिया व्यवस्थित व्हावी.