Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपेत पायात गोळे येतात, प्रचंड वेदना होते? पाहा पायात गोळे येण्याची कारणं आणि उपाय

रात्री झोपेत पायात गोळे येतात, प्रचंड वेदना होते? पाहा पायात गोळे येण्याची कारणं आणि उपाय

Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies : पायात सारखे गोळे येतात? जाणून घ्या का येतात. दुखणे होईल दूर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 17:42 IST2025-06-02T17:40:16+5:302025-06-02T17:42:23+5:30

Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies : पायात सारखे गोळे येतात? जाणून घ्या का येतात. दुखणे होईल दूर.

Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies | रात्री झोपेत पायात गोळे येतात, प्रचंड वेदना होते? पाहा पायात गोळे येण्याची कारणं आणि उपाय

रात्री झोपेत पायात गोळे येतात, प्रचंड वेदना होते? पाहा पायात गोळे येण्याची कारणं आणि उपाय

रात्री गाढ झोपेत असताना अचानक पाय जड जाणवायला लागतो आणि आपण कळवळून जागे होतो. पायाच्या पोटरीमध्ये एकदा गोळा आला की तो फार दुखरा ठरतो. (Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies )पायाला मुंग्या येतात आणि पोटरीला हात लावला तरी ओरडायची वेळ येते. काही मिनिटांमध्ये पोटरी पुन्हा नेहमी सारखी होते. मात्र ती काही मिनिटे फार त्रासदायक ठरतात. फक्त झोपेतच नाही तर चालताना पायात गोळा येतो. धावल्यावर किंवा खेळताना असे गोळे पायात येतात. तुम्हालाही सतत पोटरीत गोळा येतो का? मग त्याची कारणे जाणून घ्या. जर सारखा असा गोळा येत असेल तर ते काही त्रासांचे लक्षण असू शकते. शरीरात कशाची तरी कमतरता असू शकते. वेळीच शोध लागलेला बरा. म्हणजे दुखणे वाढत नाही. 

पोटरीत गोळा शक्यतो स्नायूंच्या आकुंचनामुळे येतो. ज्याला आपण मसल क्रॅम्प्स असे म्हणतो. पोटरीच्या स्नायूंमध्ये अचानक त्रासदायक वेदना सुरु होतात. (Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies )या आकुंचनामागेही काही कारणे असतात. शरीरात पाण्याची पातळी कमी असेल तर स्नायूंवर परिणाम होतो. तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइ्टस जसे की सडियम, पॉटॅशियम हे कमी झाल्यावर पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. इतरही अनेक कारणे असतात.

 जास्त वेळ उभे राहिल्यानेही असा त्रास होतो. पायाला आराम मिळायला हवा. हेवी वर्कआऊट केल्यामुळेही गोळा येतो. शरीराचा ताण पायावर येतो. पोटऱ्यांवर जास्त ताण येतो. त्यामुळे व्यायाम करताना पायात गोळा येतो. 

वातावरणाचाही विचार करायला हवा. थंड वातावरणात स्नायूंचे आकुंचन जास्त होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रात्री शरीर आखडते. एसीमध्ये फार खाळ बसल्यामुळेही आकुंचनाची शक्यता वाढते. 

रक्ताभिसरणाच्या मार्गात काही समस्या आल्यावरही पोटरीत गोळा येतो. स्नायूंना रक्त कमी पोहचले तर त्यांना ऊर्जा कमी पडते. ऊर्जेचा अभाव असल्यावपही क्रम्प येतात.  मज्जारजूंच्या काही समस्या असतील तरी क्रॅम्प येतो. काही औषधांच्या दुष्परिणामामुळे पायात गोळा येतो. 

असा गोळा येऊ नये साठी भरपूर पाणी प्यावे. मालीश करावे. भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेडेट ठेवण्यासाठी उपाय करा. वारंवार असे होत असेल तर वेळीच वैद्य गाठा. 

Web Title: Do you get cramps in your leg while sleeping at night, causing extreme pain? See the causes and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.