Join us

सतत पाय हलवता का? नखे खाण्याची सवय आहे? दुर्लक्ष करु नका पाहा मानसशास्त्र काय सांगते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 19:50 IST

Do you constantly move your legs? see what psychology says : सतत पाय हलवण्याची सवय असेल तर त्यामागे असू शकतात ही कारणे.

आपल्याला अशा अनेक सवयी असतात ज्या फार साध्या वाटतात. त्या आपल्या वागण्याचा भाग होऊन जातात. त्यांचा आपण कधी फार विचार वगैरे करत नाही. (Do you constantly move your legs?  see what psychology says)प्रत्येक सवय काही तरी सुचित करते असे नाही, मात्र काही सवयी असतात ज्या काही त्रासांबद्दल किंवा इतर कोणत्या गोष्टींबद्दल सुचित करतात. या सवयी आपल्याला पटकन ओळखता येत नाहीत.(Do you constantly move your legs?  see what psychology says)

हातांच्या हालचाली असतात, तसेच पायांच्या हालचाली असतात. डोळे मिचकवायची सवय असते. काहींना स्थिर स्तब्ध बसताच येत नाही. या सवयी काही तर दर्शवत असतात असे मानसशास्त्र सांगते. 'एनआयएच' तसेच 'मेडीकल न्यूज टुडे' सारख्या साईट्सवर या बद्दल माहिती उपलब्ध आहे. 

अशीच एक सवय असते ती म्हणजे बसल्याबसल्या किंवा उभ्याउभ्या पाय हलवायची. काम करताना तसेच जेवतानाही काही लोक सतत पाय हलवत असतात. तज्ज्ञ सांगतात, याची अनेक कारणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एंग्झायटी. आजकाल याचे प्रमाण फार वाढले आहे. हा काही आजार नाही. मात्र वेळीच काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होऊ शकतात.  तसेच काही जण ओव्हथिंकींग करतात. त्यामुळेही शरीर गरजेच्या नसलेल्या हालचाली करायला लागते. डोक्यामध्ये विचारांचा कल्लोळ झाला असेल तरी अशा सवयी माणसाला लागतात. या मानसिक स्थितींना अनेक विविध प्रकारची नावे मानसशास्त्रामध्ये आहेत. 

एखाद्या प्रसंगी काय करावे हे सुचत नसेल की पाय अपोआप हलायला लागतो. कारण डोक्यामध्ये गोंधळ उडाला असतो. या सवयी फार कॉमन आहेत. काम करताना लक्ष कामात असले तरी पायाची हलचाल चालूच असते. त्याचे कारण मनाच्या कोपऱ्यामध्ये काही तरी सुरूच असते. ज्याचा ताण डोक्यावर येत असतो. 'पाय हलवायची सवय वाईट आहे, त्याने दारिद्र्य येते' असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र त्यामागील खरे कारण हे असते.

नखे चावणे ही सवयही अशाच मानसिक त्रासांचे लक्षण असू  शकते. त्यासाठी औषधे उपचार घेण्याची फार लोकांना गरज पडत नाही. मात्र या मानसिक स्थितीमध्ये वाढ झाली तर त्याचा परिणाम शरीरावरही होऊ शकतो. पुढे जाऊन गंभीर मानसिक आजारही होऊ शकतात. त्यामुळे अशा सवयी तुम्हाला असतील तर वेळीच काळजी घ्या. सवयीचे प्रमाण जाणून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या.    

टॅग्स : मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स