Join us

पावसामुळे वाढला सर्दी-खोकला? पाहा ‘हा’ नॅचरल उपाय-मोठ्यांसाठीच नाही तर मुलांसाठीही अत्यंत उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:42 IST

Cough and Cold Home Remedy : एक खास नॅचरल उपाय, सर्दी आणि खोकला दूर.

Cough - Cold Home Remedy : सर्दीचा त्रास या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांना होतो. पावसात थोडे भिजले, हवेत जराही बदल झाला किंवा वातावरण बदललं की, सर्दी होतेच होते. या दिवसांमध्ये केवळ लहान मुलेच नाही तर मोठेही या समस्येने त्रासलेले असतात. नेहमीच सर्दी होत असल्यानं लोक सोबत व्हिक्सची डबी ठेवतात किंवा गोळ्या ठेवतात. बरं व्हिक्सनं लगेच आराम मिळेलच असंही नाही. सर्दीची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात. असाच एक नॅचरल घरगुती उपाय आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

एक खास नॅचरल उपाय करून तुमची सर्दी आणि खोकला दूर करू शकता. डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी एक व्हिडीओ शेअर करून खास उपाय सांगितला आहे

श्वेता पांचाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, ओवा, लवंग आणि कापूर घ्या. एका तव्यावर या गोष्टी कमी आसेवर गरम करा. गरम झालेल्या गोष्टी एका कॉटनच्या कापडामध्ये बांधा. थोड्या थोड्या वेळानं याचा गंध घ्या किंवा रात्री झोपताना लहान मुलांच्या उशीखाली ठेवा. याने त्यांना आराम मिळेल आणि सर्दी-खोकलाही दूर होण्यास मदत मिळेल. छातीही मोकळी होईल. हे मिश्रण तयार करताना या गोष्टी 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाजू नका.

ओवा खाण्याचे फायदे

1) ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शनपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

2) बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्याचा तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

3) ओव्या वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

4) ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते.

5) ओव्यामध्ये फायबर, व्हिटामिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. जे शरीरातील वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स