संध्याकाळ होताच घरभर हलका अंधार पसरू लागतो, बाहेरचा ओलसर वारा वाढू लागतो आणि घराच्या वातावरणात दिवसभराची धूळ, धूर आणि ताण जमा होऊ लागतो. (Do this every evening, mosquitoes and insects will run away and the air will be clean in just twenty minutes.)अशा वेळी भारतीय परंपरेत केली जाणारी एक जुनी, प्रेमळ आणि उपयुक्त कृती म्हणजे धुरी. शेणाच्या गोवऱ्या, लाकूड, नारळाची चोडी वापरुन केली जाणारी धुरी आरोग्यासाठी चांगली असते.
तुपाची धुरी ही धुरीची सर्वात शुद्ध आणि हलकी पद्धत मानली जाते. तूप जळताना त्यातून निर्माण होणारा धूर सौम्य असतो आणि त्याचा घरावर अतिशय स्वच्छ परिणाम दिसतो. हा धूर हवेतील सूक्ष्म जंतू, ओलसरपणा आणि दुर्गंधी कमी करुन वातावरण शुद्ध करतो. तुपाच्या धुरीचा एक वेगळा गुण म्हणजे ती घरात एक उबदार भाव निर्माण करते. घरात प्रसन्न ऊर्जा पसरते.
यात जर थोडा ओवा घातला तर धुरीचे गुण अगदी दुपटीने वाढतात. ओवा हा उष्ण आणि जंतुनाशक असतो. ओवा जळताना त्यातून येणारा सुगंध घरातील कफयुक्त हवा हलकी करतो आणि श्वसनमार्गांसाठी आरामदायी ठरतो. ओव्याच्या धुरीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ती कीटकांना, विशेषतः डासांना, सहन होत नाही. त्यामुळे धुरी केल्यावर घरातील डासांचा वावर कमी होतो आणि हवा ताजी जाणवते.
धुरीत तूप आणि ओव्याबरोबर अजूनही काही नैसर्गिक पदार्थ घालून तिच्या परिणामकारकतेत वाढ करता येते. उदाहरणार्थ, लवंग घातली तर वातावरणाला सौम्य सुगंध मिळतो आणि हवेत जंतुनाशक गुण वाढतात. कापूर हा तर धुरीचा अविभाज्य भागच. त्याचा तीव्र पण पवित्र सुगंध हवेतली अशुद्धता कमी करतो.
संध्याकाळची धुरी ही केवळ हवा स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नसते; ती एकप्रकारे घराला मिळणारी नैसर्गिक थेरपी आहे. धुरीमुळे हवा हलकी, जंतूमुक्त आणि उबदार राहते. डास, कीटक आणि दुर्गंधी नाहीशी होते. श्वसनास त्रास होत असेल तर धुरीचा सुगंध वातावरण चांगले ठेवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धुरी मनावर शांत परिणामही देते. घर अधिक प्रसन्न, स्थिर आणि दिवसभराच्या धकाधकीनंतर पुन्हा शांत वाटू लागते.
आजच्या आधुनिक काळात, हवा प्रदूषण आणि कीटकनाशकांच्या स्प्रेने भरलेलं उपाय पाहता, संध्याकाळची नैसर्गिक धुरी हा एक सुरक्षित आणि शुद्ध पर्याय आहे. तूप, ओवा, लवंग, कापूर, हळद, पाला यासारखे पदार्थ अगदी किरकोळ प्रमाणात वापरले तरी घराला स्वच्छ, सुगंधित आणि आरोग्यदायी बनवतात. ही एक छोटीशी पण प्रभावी क्रिया आहे जी घरातील सगळ्यांना चांगले आरोग्य देते.
Web Summary : Evening smoke, using ghee, cloves, and camphor, naturally purifies air. It repels mosquitoes, eliminates odors, creates a calming, healthy, and fragrant home environment.
Web Summary : शाम की धूप, घी, लौंग और कपूर से, हवा को प्राकृतिक रूप से शुद्ध करती है। मच्छरों को दूर भगाती है, दुर्गंध को खत्म करती है, और घर में शांत, स्वस्थ और सुगंधित वातावरण बनाती है।