अनेकदा असं पाहिलं जातं की रात्रीच्या जेवणानंतर पचनाच्या समस्या उद्भवतात. बरेच लोक रात्री उशीर जेवण करतात. ज्यात मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, गोड पदार्थही असतात असे पदार्थ उशीरा पचतात आणि पोटात गॅस तयार होतो आणि खूपच जड वाटतं. (3 Aasan For Relief Gas and Constipation) रात्रीच्या जेवणानंतर पोट गच्च भरतं याला अनेक कारणं असू शकतात. ज्यामुळे ओव्हरइटींग, कमकुवत पचनशक्ती होते. रात्री पचनक्रियासंथ होते. उशीरा जेवल्यानं ही समस्या अधिकच वाढू शकते. रात्रीचं जेवण हे हलकं असायला हवं. कमीत कमी २ ते ३ तास आधी अन्नाचं सेवन करावं. (Do These 3 Aasan For Relief Gas and Constipation Yoga Poses For Constipation)
जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील जसं की गॅस, एसिडिटी,ब्लॉटींग तर तुम्ही डाएट कंट्रोल करून शरीर एक्टिव्ह ठेवू शकता. रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवत असतील तर काही योगासनं केल्यानं तुमचा हा त्रास दूर होईल. आयुर्वेदीक एक्सपर्ट्स आणि योग गुरू बाबा रामदेव सांगतात की बसल्या जागी तुम्ही ३ योगासनं करून पटकन वजन कमी करू शकता ही योगासनं तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर करावी लागतील.
सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा
रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला शरीर एक्टिव्ह ठेवायचं असेल तर वज्रासनात बसा. वज्रासन एक योगासन आहे ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. वज्रासनात बसल्यानं गॅस कंट्रोलमध्ये राहतो आणि पोट साफ होण्यासही मदत होते. ज्यामुळे ताण-तणाव कंट्रोल होतो आणि मन शांत राहते. सगळ्यात आधी गुडघ्यांवर बसा. नंतर दोन्ही हात आपल्या गुडघ्यावंर ठेवा. त्यानंतर कंबर सरळ ठेवा आणि छातीचा भाग थोडा पुढच्या बाजूला ठेवा. काहीवेळ याच स्थितीत राहिल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. जर रात्रीच्या जेवणानंतर पोटात गॅस तयार होत असेल तर पवनमुक्तासन करा.
हे योगासन केल्यानं पोटातील गॅस कंट्रोलमध्ये राहतो. झोपण्याआधी हा व्यायाम करा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहील. जेवल्यानंतर सुखासन केल्यानंही पचनक्रिया चांगली राहते. मन आणि मेंदू शांत राहतो. हे केल्यानं ताण-तणाव आणि थकवा कमी होतो. जमीनिवर चटई पसरवून पाठ सरळ ठेवा आणि खांदे सैल सोडा. नंतर दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडा.