Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जो तो म्हणतो भरपूर पाणी प्या, पण भरपूर म्हणजे किती? पाणी कसं, किती प्यावं-तज्ज्ञ सांगतात....

जो तो म्हणतो भरपूर पाणी प्या, पण भरपूर म्हणजे किती? पाणी कसं, किती प्यावं-तज्ज्ञ सांगतात....

Do Not Make These 4 Mistakes While drinking Water : बरेच लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टीकच्या बॉटलचा वापर करतात. पण यामुळे पाण्यात मायक्रोप्लास्टीक मिसळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:53 IST2026-01-16T16:01:05+5:302026-01-16T18:53:12+5:30

Do Not Make These 4 Mistakes While drinking Water : बरेच लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टीकच्या बॉटलचा वापर करतात. पण यामुळे पाण्यात मायक्रोप्लास्टीक मिसळते.

Do Not Make These 4 Mistakes While drinking Water Know Correct Way From Nutrition Expert | जो तो म्हणतो भरपूर पाणी प्या, पण भरपूर म्हणजे किती? पाणी कसं, किती प्यावं-तज्ज्ञ सांगतात....

जो तो म्हणतो भरपूर पाणी प्या, पण भरपूर म्हणजे किती? पाणी कसं, किती प्यावं-तज्ज्ञ सांगतात....

पाणी हा शरीरासाठी खूपच महत्वाचा घटक आहे. पण बरेच लोक पाणी पिताना अशा काही चुका करतात ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.९० टक्के लोक नकळतपणे पाणी पिताना या चूका करतात. अशावेळी ४ चुका टाळल्या तर तुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिऊ शकता तसंच तब्येतीचंही होणारं नुकसान टाळता येतं. आहारतज्ज्ञ सलोनी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पाणी पिण्याची योग्य पद्धतही सांगितली आहे. ( Do Not Make These 4 Mistakes While drinking Water Know Correct Way From Nutrition Expert)

बरेच लोक एका श्वासात ग्लासभर पाणी पितात. न्युट्रिशनिस्ट सलोनी सांगतात की यामुळे शरीराला मिनी शॉक लागतो. वेगानं पाणी गिळल्यामुळे शरीर ते व्यवस्थित प्रोसेस करू शकत नाही ज्यामुळे पोट फुगणं, एसिडीटी यांसारख्या समस्या वाढतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी पाणी पिताना तुम्ही काही छोट्या चुका टाळल्या तर तुमचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं आणि पाणी पिण्याचा पुरेपूर फायदा देखील होईल. तसंच पोटाचे त्रासही कमी होतील.

फ्रिजचं किंवा केटलचं पाणी तसंच पिणं

बरेच लोक फ्रिज किंवा किटलीमधून काढून त्वरीत थंड किंवा गरम पाणी पितात. न्युट्रिशनिस्ट एक्सपर्ट्स सलोनी सांगतात की थंड प्यायल्यानं शरीराला तापमान  एडजस्ट करायला अतिरिक्त ऊर्जा लागू शकते. म्हणून रूम टेम्परेचरवरचं पाणी प्यायला हवं.

जेवल्यानंतर ग्लासभर पाणी पिणं

 न्युट्रिशनिस्ट सांगतात की जेवल्यानंतर १ ग्लासभर पाणी प्यायल्यानं जठराग्नि प्रभावित होतो. ज्यामुळे  अन्न पचणं कठीण होऊ शकतं तसंच ब्लोटींगची समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत खाण्याच्या अर्धा तास आधी किंवा १ ते २ तास आधी पाणी प्या. जेवताना पाणी प्यायचं नसेल तर  छोटे छोटे घोट घेऊन पाणी प्या.


प्लास्टीकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं

बरेच लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टीकच्या बॉटलचा वापर करतात. पण यामुळे पाण्यात मायक्रोप्लास्टीक मिसळते आणि शरीराला नुकसान पोहोचू शकते. अशावेळी तुम्ही स्टिल किंवा तांब्याच्या धातूचा वापर करायला हवा.

Web Title : विशेषज्ञों की राय: आपको कितना पानी पीना चाहिए और कैसे?

Web Summary : गलत तरीके से पानी पीने से सेहत को नुकसान हो सकता है। पोषण विशेषज्ञ सलोनी पानी को तेजी से पीने, बहुत गर्म या ठंडा पानी पीने और भोजन के तुरंत बाद पीने से बचने की सलाह देती हैं। प्लास्टिक की बोतलों के बजाय स्टील या तांबे की बोतलों का उपयोग करें। इन सरल बदलावों से पाचन और समग्र स्वास्थ्य में सुधार होगा।

Web Title : Experts on proper hydration: How much water should you drink?

Web Summary : Drinking water improperly can harm your health. Nutritionist Saloni advises avoiding gulping water, drinking extremely hot or cold water, and drinking immediately after meals. Use steel or copper bottles instead of plastic. These simple changes will improve digestion and overall well-being.