Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चुकूनही खाऊ नका 'हे' ३ पदार्थ, पोटासाठी जणू विष, पोटदुखी- बद्धकोष्ठतेचा त्रासही वाढतो

चुकूनही खाऊ नका 'हे' ३ पदार्थ, पोटासाठी जणू विष, पोटदुखी- बद्धकोष्ठतेचा त्रासही वाढतो

Foods that cause stomach pain and acidity: Worst foods for digestion and gut health: रोजच्या आहारातील ३ पदार्थ कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 13:01 IST2025-06-05T12:42:36+5:302025-06-05T13:01:37+5:30

Foods that cause stomach pain and acidity: Worst foods for digestion and gut health: रोजच्या आहारातील ३ पदार्थ कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊया.

Do not eat these 3 foods by mistake poison for gut health starting stomach pain constipation acidity expert | चुकूनही खाऊ नका 'हे' ३ पदार्थ, पोटासाठी जणू विष, पोटदुखी- बद्धकोष्ठतेचा त्रासही वाढतो

चुकूनही खाऊ नका 'हे' ३ पदार्थ, पोटासाठी जणू विष, पोटदुखी- बद्धकोष्ठतेचा त्रासही वाढतो

हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय झाली आहे.(Never eat these 3 foods ) चटकदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.(Avoid these 3 common foods immediately) तसेच बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांवरही परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये चांगेल बॅक्टेरिया कमी प्रमाणात तयार होतात. (Toxic foods hiding in your daily diet)
आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खाण्याची सवय असते. ज्यामुळे आपले पोट तर भरते परंतु अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(Poisonous foods for your gut health) जंक फूड खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार, आम्लता आणि पोटदुखी सारख्या पचनाचा समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये काही आतड्यांसंबंधी गंभीर आजार देखील वाढतात.(Worst foods for digestion and gut health) सततच्या जंकफूडमुळे आपल्या गट हेल्थवर देखील तितकाच परिणाम होतो. ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. (Foods that trigger constipation and bloating) आहारतज्ज्ञ म्हणतात की, सततच्या जंकफूडमधील हे ३ पदार्थ रोज खाल्ल्याने त्याचा आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे ३ पदार्थ कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊया. 

पोट -मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात मिसळा हा पदार्थ, कमी खर्चात मस्त उपाय

भूक लागल्यानंतर अनेकांना प्रोसेस्ड फूड खाण्याची सवय असते. चिप्स, चॉकलेट, कँडी, आईस्क्रीम, पॅकेज्ड सूप, चिकन, नगेट्स सारखे अनेक तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ आपण खातो. यात प्रिझर्व्हेटिव्हज आणि अस्वास्थ्य्कर चरबी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आतड्यांना जास्त त्रास होतो. यामुळे पोटाचे विकार वाढण्याची शक्यता अधिक असते. 

तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे पोटफुगी, गॅस किंवा अपचनाची समस्या वाढते. यात तळण्यासाठी रिफाइंड ऑलिव्ह ऑइल किंवा एवोकाडो ऑइल, तूप किंवा रिफाइंड खोबऱ्याचे तेल यांसारखे खाणे टाळा. यामुळे शरीरातील चरबी वाढते. 


आतड्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळायला हवे. यामध्ये कृत्रिम गोड पदार्थांचा समावेश असतो. जे आपल्या आतड्याच्या मायक्रोबायोमवर नकारात्मक परिणाम करतात. 

Web Title: Do not eat these 3 foods by mistake poison for gut health starting stomach pain constipation acidity expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.