Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दिवाळीच्या आनंदात लिव्हर पडायचं आजारी, 'या' ४ गोष्टी टाळा नाही तर वाढेल फॅटी लिव्हरचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:30 IST

Fatty Liver Risk in Diwali Season : दिवाळीच्या दिवसांमध्ये जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर लिव्हर खराब होऊ शकतं. ते कसं? हेच आपण समजून घेणार आहोत

Fatty Liver Risk in Diwali Season : दिवाळी म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा उत्सव असतो. यात कुटुंबिय किंवा मित्रपरिवार, शेजारी एकत्र येऊन आनंद साजरा करतात. पण या आनंदाच्या दिवसात आपलं लिव्हर मात्र बिघडतंय का? कारण या दिवसांमध्ये (Diwali 2025) जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर असं नक्कीच होऊ शकतं. ते कसं? हेच आपण समजून घेणार आहोत आणि त्यावर काही उपाय देखील पाहणार आहोत.

लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने अन्न पचन होतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासोबतच इतरही अनेक कामे लिव्हर करतं. अशात लिव्हर निरोगी ठेवण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. मात्र, आपल्या रोजच्याच काही सवयींमुळे लिव्हरच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थांचं भरपूर सेवन केलं जात. अशात जास्त मीठ, साखर, मैदा आणि फॅट असलेल्या पदार्थांमुळे लिव्हर प्रभावित होतं.

लिव्हरमध्ये बिघाडाची लक्षणं

लिव्हरमध्ये जर काही बिघाड झाला तर तुमची भूक कमी होते, अचानक वजन कमी होतं, जिभेवर एक थर साचतो, रक्त कमी होतं, बद्धकोष्ठता आणि ठेकर येणं अशी लक्षणं दिसू लागतात. मग लिव्हरचं कोणत्या पदार्थांनी नुकसान होतं आणि ते हेल्दी ठेवण्यासाठी कशाचं सेवन करावं हे जाणून घेऊया.

जास्त तिखट आणि तळलेले पदार्थ टाळा

दिवाळी सण म्हटला की, मसालेदार, चटपटीत, गोड पदार्थ खाण्याची चांगलीच चंगळ असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या पदार्थांचा आनंद घेतात. पण या दिवसात जास्त तेकलट, तिखट पदार्थ खाल्ल्यानं लिव्हरचं आरोग्य बिघडू शकतं. आपल्याला फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. जर आपल्याला आधीच लिव्हरची समस्या असेल तर आपण केवळ हेल्दी पदार्थच खायला हवेत.

जास्त मीठ खाणं टाळा

दिवाळीत फराळ खाणं सगळ्यांनाच आवडतं. वेगवेगळे चटपटीत आणि मसालेदार खमंग पदार्थ घराघरांमध्ये बनवले जातात. जे खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. पण या पदार्थांमध्ये मीठ जास्त असल्याने याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. सोबतच याचा लिव्हरलाही फटका बसतो. जेवणात किंवा पदार्थांवर वरून मीठ घेणं जास्त घातक असतं. अशात मीठ कमी खा.

मद्यसेवन टाळा

दिवाळीच्या सुट्टी नातेवाईक, मित्र-परिवार एकत्र येतो. गप्पा-गोष्टींच्या, गाण्यांच्या मैफीली रंगतात. अशात एक पेग सुद्धा लगावला जातो. पण जर लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी दारू पिणं कमी करा किंवा बंद करा. फेस्टिव सीझनमध्ये दारूचं पिण्याचं प्रमाण वाढतं. पण जर टाळता येत असेल तर मद्यसेवन टाळाच. कारण दारू फॅटी लिव्हरचं सगळ्यात मोठं कारण आहे.

पुरेशी झोप घ्या

उत्सवाच्या दिवसांमध्ये घरातील आणि बाहेरची भरपूर कामे असतात. अशात अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. तसेच एका रिसर्चनुसार, दिवसा झोपणाऱ्या लोकांमध्येही फॅटी लिव्हरचा धोका असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे रोज वेळेवर झोपा आणि रात्री साधारण ७ ते ८ तास झोप घ्या.

दिवाळीच्या दिवसांत आनंद आणि गोडधोड दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, पण लिव्हरचं आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मद्याचे टाळलेले सेवन हेच लिव्हर हेल्दी ठेवण्याचे खरे रहस्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Delights, Liver's Plight: Avoid These 4 Things!

Web Summary : Enjoy Diwali but protect your liver! Avoid excessive sweets, fried foods, salt, and alcohol. Prioritize sleep to prevent fatty liver issues. A balanced approach is key for a healthy festive season.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदिवाळी २०२५