Dirtiest Part Of Human Body: शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी लोक रोज अंघोळ करतात आणि हायजिनकडे लक्ष देतात. अंघोळ करताना साबण, बॉडी वॉश किंवा शाम्पूचा वापर केला जातो. शरीराचा प्रत्येक भाग व्यवस्थित धुतला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की शरीराचा असा कोणता भाग आहे जो सगळ्यात अस्वच्छ असतो आणि ज्यात लाखो बॅक्टेरिया असतात.
कदाचित आपल्याला कल्पना नसेल की, रोज शरीराची व्यवस्थित स्वच्छता केल्यानंतरही असा भाग राहतो ज्याची पूर्णपणे स्वच्छता होतच नाही. या अवयवामध्ये अब्जो बॅक्टेरिया राहतात. पण आपल्याला त्याची कल्पनाही नसते.
2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, आपल्या नाभीमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभी स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.
सायन्स सांगतं की, नाभी मुळात शरीरावरील एक घाव आहे. हा घाव तेव्हा तयार होतो जेव्हा बाळ आपल्या आईपासून वेगळं होतं. नाभि सामान्यपणे आतल्या बाजूने खोल असते.
टोरांटोमध्ये डीएलके कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि लेजर क्लीनिकच्या त्वचा एक्सपर्टनुसार, नाभी बॅक्टेरियासाठी एक आदर्श प्रजनन स्थळ आहे. जर तुमचं वजन जास्त असेल, टाइप 2 डायबिटीस किंवा नाभीमध्ये छिद्र असेल. नाभी स्वच्छ करण्यासाठी वॉशक्लॉथचा वापर केला जाऊ शकतो.
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभीमध्ये खाज आली, नाभी लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नाभी कशी स्वच्छ करावी?
नाभीत जमा झालेली घाण काढण्यासाठी आठवड्यातून एकदा कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करा.
गरम पाण्याने धुतल्यास चिकटपणा सहज निघतो.
अंघोळ करताना शरीराच्या इतर भागांसारखीच नाभीही नीट धुवा.
जर नाभीत खाज, लालसरपणा किंवा पुरळ जाणवत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीराच्या या लहानशा भागाकडे दुर्लक्ष करू नका, कारण इथे वाढणारे बॅक्टेरिया तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.