Join us

अभिनेत्री दीपिका कक्करच्या लिव्हरमध्ये ट्यूमर, वाचा काय असतो हा ट्यूमर आणि कशामुळे होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:52 IST

Liver Tumor Causes : जेव्हा रिपोर्ट समोर आले तेव्हा समजलं की, दीपिकाच्या लिव्हरमध्ये एका बाजूला एक मोठा ट्यूमर आहे. हा ट्यूमर टेनिस बॉल इतका मोठा असल्याचं आढळून आलं.

Liver Tumor Causes : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakkad) आजकाल आरोग्यासंबंधी गंभीर समस्येने झगडत आहे. दीपिकाचा पती अभिनेता शोएब इब्राहिमनं (Shoaib Ibrahim) एका व्लॉगमधून सांगितलं की, दीपिकाच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून दुखत होतं. आधी वाटलं ही केवळ अ‍ॅसिडिटी असेल, पण दुखणं काही कमी झालं नाही. त्यानंतर त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. काही टेस्ट केल्या तर ब्लडमध्ये इन्फेक्शन निघालं, ज्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आला.

जेव्हा रिपोर्ट समोर आले तेव्हा समजलं की, दीपिकाच्या लिव्हरमध्ये एका बाजूला एक मोठा ट्यूमर (Liver Tumor) आहे. हा ट्यूमर टेनिस बॉल इतका मोठा असल्याचं आढळून आलं. हे समोर येताच दोघांनाही धक्का बसला. डॉक्टरांनी त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. सुरूवातीच्या रिपोर्ट्सनुसार, हा ट्यूमर कदाचित बेनाइन आहे (कॅन्सर नसलेला), पण काही टेस्ट अजूनही बाकी आहेत. दीपिकाचं ऑपरेशन लवकरच कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं. अशात त्यांच्या फॅन्सना सुद्धा प्रश्न पडला आहे की, ही समस्या नेमकी काय आहे आणि कशामुळे होते? तेच आज जाणून घेऊ.

काय असतो लिव्हर ट्यूमर?

लिव्हरमध्ये ट्यूमर होणं याचा अर्थ लिव्हरमध्ये असामान्य पद्धतीनं कोशिका वाढणं असा होतो. हे ट्यूमर वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ज्यात काही कॅन्सरयुक्त तर काही कॅन्सरयुक्त नसलेले असतात. लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याचा सगळ्यात कॉमन प्रकार हेपाटोसेलुलर कार्सिनोमा (HCC) आहे, जो लिव्हरच्या कोशिकांमध्ये होतो.

लिव्हरमध्ये ट्यूमरची लक्षणं

लिव्हरमध्ये ट्यूमर असेल तर शरीरात काही लक्षणं दिसून येतात. यात अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे, पोटाच्या वरच्या भागात वेदना, मळमळ किंवा उलटी, सतत कमजोरी आणि थकवा, पोटावर सूज, काविळ, डोळे पिवळे होणे या समस्यांचा समावेश असतो.

लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याची कारणं

लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याचं एक मुख्य कारण दीर्घकालिन लिव्हरसंबंधी समस्या आहे. ज्यात हेपेटायटिस बी किंवा सी इन्फेक्शऩ आणि सिरोसिस यांचा समावेश आहे. जास्त मद्यसेवन सुद्धा लिव्हरचं नुकसान करतं आणि यामुळे लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. त्याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्यानं सुद्धा लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याचा धोका वाढतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सदीपिका कक्करआरोग्य