Join us
Daily Top 2 Weekly Top 5

१ चपाती पचायला किती तास लागतात माहिती आहे? पाहा गहू-नाचणी आणि बाकी धान्याचा 'डायजेशन टाईम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 13:07 IST

How to improve digestion speed naturally: Health benefits of Ragi and Millets: गहू पचायला हलका असतो की जड? नाचणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे? आणि 'मल्टीग्रेन' पीठ खरंच पचायला सोपं असतं का? पाहूया सविस्तर

भारतीय जेवणात पोळी किंवा चपाती हा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रात गव्हाची चपाती किंवा ज्वारी-बाजरीची भाकरी असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण आपण कधी विचार केला आहे का, की आपण खाल्लेली ही चपाती आपल्या पोटात गेल्यावर नक्की किती वेळात पचते? (Digestion time of one wheat roti) अनेकदा आपल्याला जेवणानंतर जडपणा जाणवतो किंवा गॅस-अपचनाचा त्रास होतो, याचं मुख्य कारण आपण खात असलेले पदार्थ आणि त्याच्या पचनाचा वेग असू शकतो.(How long does it take to digest chapati) आजच्या काळात 'फिट' राहण्यासाठी काय खातोय हे महत्त्वाचं नाही, तर ते किती वेळात पचतंय (Digestion Time) हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. गहू पचायला हलका असतो की जड? नाचणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे? आणि 'मल्टीग्रेन' पीठ खरंच पचायला सोपं असतं का? पचनसंस्थेसाठी आवश्यक काय आहे. (Best flour for easy digestion) पाहूया रोजच जेवणात नेमकं काय खावं. वजन कमी करण्यासाठी काय करावं पाहूया.  

हळदीचं दूध कधी प्यावं, सकाळी की रात्री? ७ फायदे, चेहऱ्यावर येईल ग्लो- हाडांना मिळेल पोलादासारखी मजबुती!

1. गव्हात ग्लूटेन नावाचे प्रथिन असते. गव्हाची चपाती पचायला साधारणपणे २ ते ३ तास लागतात. जर आपण खूप जास्त तेल किंवा तूप लावून पराठा खात असाल, तर हे ४ तासांपर्यंत वाढू शकतो. गव्हात फायबरचे प्रमाण मध्यम असते, त्यामुळे ती मध्यम वेगाने पचते. 

2. नाचणी हे एक सुपरफूड आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. जास्त फायबर असल्यामुळे नाचणी पचायला गव्हापेक्षा थोडा जास्त वेळ घेते, साधारण ३ ते ४ तास. नाचणी हळूहळू पचत असल्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. बराच वेळ भूक लागत नाही. 

3. ज्वारीची भाकरी थंड आणि पचायला अत्यंत हलकी मानली जाते. ज्वारीची भाकरी साधरण २ ते २.५ तासांत सहज पचते. ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा ज्यांना ग्लूटेन-फ्री आहार हवा आहे, त्यांच्यासाठी ज्वारी ही गव्हाला चांगला पर्याय आहे. 

4. मका चवीला गोड असला तरी पचायला जड असतो. मक्याच्या भाकरीला पूर्णपणे पचण्यासाठी ३.५ ते ५ तास लागू शकतात. मक्यामध्ये स्टार्च जास्त असल्याने तो शरीरात ऊर्जा निर्माण करतो, पण रात्रीच्या वेळी मका खाणे टाळलेलेच बरे.

5. मल्टीग्रेन म्हणजे अनेक धान्यांचे मिश्रण. याचे पचन कोणती धान्ये मिसळली आहेत यावर अवलंबून असते. सोयाबीन, चणा, बाजरी आणि गहू असते. हे पीठ पचायला ४ ते ५ तास लागू शकते. अनेक प्रकारची धान्ये एकत्र पचवणे पचनसंस्थेसाठी थोडे जड असू शकते, त्यामुळे कमकुवत पचनशक्ती असलेल्यांनी हे टाळावे.

6. रात्रीच्या वेळी नेहमी हलका आहार घ्यावा. ज्वारीची भाकरी रात्रीसाठी उत्तम आहे, कारण ती लवकर पचते आणि शांत झोप लागण्यास मदत करते. फायबरयुक्त धान्य नाचणी, बाजरी खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, अन्यथा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Digestion Time: How Long Does One Chapati Take to Digest?

Web Summary : Different flours digest at varying rates. Wheat takes 2-3 hours, while nachni takes 3-4. Jowar is lightest, digesting in 2-2.5 hours. Multigrain can take 4-5 hours. Lighter meals, like jowar, are best at night.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नवेट लॉस टिप्स