List of Phobias: आपण पाहिलं असेल की, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यातील कुणाला अंधाराची भीती असते, उंचीची, कुणाला पाण्याची तर कुणाला खोल दरीची भीती वाटते. आपल्या सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. पण अनेकांना तर हे माहीत नसतं की, त्यांना कोणत्या गोष्टीची भीती आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते आणि त्या भीतीला कोणता फोबिया म्हणतात, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. जर वेळीच आपल्याला हे समजलं तर त्या गोष्टीची भीती आपण कमी करू शकता.
फोबिया म्हणजे काय?
फोबिया एक अशी भीती असते, जो फार भयावह नसूनही फार तीव्र जाणवतो. जो शरीरासोबतच मेंदूलाही प्रभावित करतो. चला जाणून घेऊया कोणकोणते फोबिया असतात.
फोबियांचे प्रकार
प्राण्यांसंबंधी वाटणाऱ्या भीतीला जूफोबिया असं म्हणतात.
सायनोफोबिया - कुत्र्यांबाबत वाटणारी भीती
एल्यूरोफोबिया - मांजरींची वाटणारी भीती
ओफिडियोफोबिया - सापांची भीती
अराक्नोफोबिया - कोळींची वाटणारी भीती
निसर्गासंबंधी वाटणारी भीती
एक्रोफोबिया - उंचीची भीती
एस्ट्राफोबिया - वीजा, ढगांचा आवाज आणि वादळाची भीती
एक्वाफोबिया - पाण्याची भीती
निक्टोफोबिया - अंधाराची भीती
एनेमोफोबिया - जोरदार वाऱ्याची भीती
मेडिकल आणि हेल्थसंबंधी फोबिया
ट्रिपॅनोफोबिया - इंजेक्शन घेण्याची भीती
हेमेटोफोबिया - रक्त बघून वाटणारी भीती
नोसोफोबिया - गंभीर आजाराची भीती
थानाटोफोबिया - मरणाची भीती
जागा आणि परिस्थितींसंबंधी फोबिया
क्लॉस्ट्रोफोबिया - बंद जागांची भीती
एगोराफोबिया - गर्दीची वाटणारी भीती
एयरोफोबिया - विमानात बसण्याची भीती
बाथोफोबिया - खोल दरीची भाती
गेफायरोफोबिया - पूल पार करण्याची भीती
वस्तू आणि अनुभवांशी निगडीत फोबिया
ट्रायपोफोबिया - छंदांच्या पॅटर्नची भीती
पायरोफोबिया - आगीची भीती
क्रोनोफोबिया - वेळ निघून जाण्याची भीती
ऑनलाईन टेस्ट
इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आणि अॅप्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपल्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला तिथे काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ज्याद्वारे हे समजून घेतलं जाऊ शकतं की, आपल्याला कोणता फोबिया असू शकतो.
