Difference Between Vitamin D And D3 : आपल्या शरीरासाठी वेगवेगळे व्हिटामिन्स महत्वाचे असतात. त्यातीलच एक म्हणजे व्हिटामिन डी. व्हिटामिन डी ला 'सनशाईन व्हिटामिन' असंही म्हटलं जातं. या व्हिटामिननं हाडं मजबूत होतात, इम्यूनिटी वाढते आणि मूडही चांगला राहतो. पण आपल्याला माहीत आहे का की, व्हिटामिन डी चे तीन प्रकार आहेत. Vitamin D, D2 आणि D3. पण यात फरक काय असतो हे आज आपण समजून घेणार आहोत.
काय आहे Vitamin D?
सगळ्यात आधी तर हे बघुया की, व्हिटामिन डी काय असतं. व्हिटामिन डी शरीरासाठी खूप महत्वाचं मानलं जातं. यानं कॅल्शिअम अॅब्जॉर्ब करण्यास मदत मिळते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. याचा इतकाच फायदा नाही तर यानं शरीराची इम्यून सिस्टीम हेल्दी राहते. तसेच व्हिटामिन डी मुळे स्नायूंना आराम मिळतो. स्नायूंमधील कमजोरी आणि वेदना रोखण्याचं काम देखील हे व्हिटामिन करतं.
व्हिटामिन D2 काय आहे?
व्हिटामिन D2 मुख्य रूपाने झाडी-झुडपं आणि फंगसमध्ये आढळतं. हे व्हिटामिन अल्ट्राव्हायलेट लाइटच्या संपर्कात आल्यावर तयार होतं. व्हिटामिन डी2 डेअर उत्पादनं, प्लांट बेस्ड मिल्क आणि इतर फोर्टिफाइड फूड्समध्ये मिक्स केलं जातं. जेव्हा आपण दूध पितो, संत्री किंवा काही धान्य खातो तेव्हा व्हिटामिन डी2 मिळतं.
काय आहे D3?
व्हिटामिन D3 आपल्या त्वचेमध्ये तेव्हा तयार होतं तेव्हा त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते. याला कोलेकॅल्सीफेरोल असंही म्हटलं जातं. यानं हाडं मजबूत राहण्यास आणि त्यांची बनावट कायम ठेवण्यास मदत मिळते. शरीरात व्हिटामिन डी चं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्वाचं ठरतो.
व्हिटामिन D आणि D3 मधील फरक
व्हिटामिन डी आणि व्हिटामिन डी3 दोन्ही वेगवेगळी रूपं आहे. पण दोन्ही व्हिटामिन डी चे प्रकार आहेत. व्हिटामिन डी 3 ज्याला कोलेकॅल्सीफेरोल असंही म्हटलं. हे त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर नॅचरली शरीरात तयार होतं. हे व्हिटामिन डी चं सक्रिय रूप आहे. हे रूप कॅल्शिअम आणि फॉस्फोरसचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतं. हाडं आणि दातांसाठी देखील हे महत्वाचं व्हिटामिन आहे. व्हिटामिन डी3 ला व्हिटामिन डी2 च्या तुलनेत शरीरात अधिक प्रभावी मानलं जातं. कारण ते मिळवणं देखील सोपं आहे.
व्हिटामिन डी कमी झाल्याचे संकेत
- जर तुमच्या हाडांमध्ये वेदना आणि कमजोरी सोबतच स्नायूंमध्ये सतत वेदना होत असतील तर यांचं कारण व्हिटामिन डी ची कमतरता असू शकतं.
- शरीरात व्हिटामिन डी ची कमी होण्याचा प्रभाव तुमच्या मूडवरही दिसतो. या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे शरीरात सेराटोनिन हार्मोनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो. याच कारणाने तुमच्या मूडमध्ये सतत बदल होतो.
- जर तुम्हाला ऊर्जा कमी जाणवत असेल, सतत थकवा आणि आळस राहत असेल तर हा व्हिटामिन डी कमी झाल्याचा संकेत असू शकतो.
- जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर याचा प्रभाव तुमच्या ब्लड प्रेशरवर पडू शकतो.
- खासकरून महिलांमध्ये व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास त्यांना तणावाचा अधिक सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना निराशा येते. महिलांना व्हिटामिन डी ची अधिक गरज असते.