Join us

पोट साफ होण्यासाठी सकाळी दोन मिनिटांत करा ‘हा’ सोपा उपाय, दिवसभराची चिडचिड-डाेकेदुखीही गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:01 IST

Constipation Diet: पोट फुगतं, जडपणा वाटतो, अस्वस्थ वाटतं? अशात या समस्येवर एक डायटिशिअन शिल्पा अरोडा यांनी माहिती दिली आहे. 

Constipation Diet: बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे ज्यात सकाळी पोट साफ होत नाही. कितीही वेळ टॉयलेटमध्ये बसून किंवा जोर लावूनही पोट साफ होत नाही. आजकाल तर ही समस्या जास्तीत जास्त लोकांना होते. जर पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर दिवसभरही कामात लक्ष लागत नाही. पोट फुगतं, जडपणा वाटतो, अस्वस्थ वाटतं. अशात या समस्येवर  डायटिशिअन शिल्पा अरोडा यांनी माहिती दिली आहे. 

पोट झटपट कसं साफ होईल?

डायटिशियन सांगतात की, पोट जर रोज सकाळी व्यवस्थित साफ होत नसेल तर रोज एक गाजर चावून खा. कारण गाजरामध्ये भरपूर फायबर असतं. जे पचन तंत्राला चांगल्या पद्धतीनं साफ करतं. 

पोट साफ करण्यासाठी डायशियननं आणखी एक उपाय सांगितला तो म्हणजे कच्ची पपई. त्या सांगतात की, कच्ची पपई जर योग्य पद्धतीनं खाल्ली गेली तर यानं पोट साफ होण्यास मदत मिळेल. कच्च्या पपईचा पराठा देखील खूप फायदेशीर ठरतो. कच्च्या पपईने शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात.

बद्धकोष्ठता होण्याची कारणं

बद्धकोष्ठता होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जर आपल्या आहारात फायबर नसेल तर बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

शरीरात जर पाणी कमी झालं असेल तर पोट साफ न होण्याची समस्या होते. अशात रोज भरपूर पाणी प्या.

जर आपली लाइफस्टाईल सुस्त असेल तर बद्धकोष्ठतेची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे रोज काही वेळ व्यायाम करा.

बरेच लोक वेगवेगळ्या आजारांसाठी औषधं घेत असतात, त्यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या होते. तसेच कमी झोप घेतल्यानं सुद्धा ही समस्या होते.

हार्मोन्समध्ये असंतुलन हे सुद्धा बद्धकोष्ठतेचं एक कारण आहे. ज्यामुळे अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य