Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तीन अशी फळं ज्यांचे ज्यूस डायबिटीसमध्ये घातक, ज्यूस पिऊन वाढते शुगर-जावं लागतं दवाखान्यात

तीन अशी फळं ज्यांचे ज्यूस डायबिटीसमध्ये घातक, ज्यूस पिऊन वाढते शुगर-जावं लागतं दवाखान्यात

Diabetes Diet : डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी अशा काही फळांबाबत माहिती दिली आहे, ज्यामध्ये शुगर जास्त असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:19 IST2025-08-23T15:27:16+5:302025-08-23T16:19:37+5:30

Diabetes Diet : डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी अशा काही फळांबाबत माहिती दिली आहे, ज्यामध्ये शुगर जास्त असते.

Dietitian tells these 3 fruit juices that are bad in diabetes | तीन अशी फळं ज्यांचे ज्यूस डायबिटीसमध्ये घातक, ज्यूस पिऊन वाढते शुगर-जावं लागतं दवाखान्यात

तीन अशी फळं ज्यांचे ज्यूस डायबिटीसमध्ये घातक, ज्यूस पिऊन वाढते शुगर-जावं लागतं दवाखान्यात

Diabetes Diet : डायबिटीस असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जर आहाराची योग्य काळजी घेतली नाही तर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Levels) अचानक वाढते किंवा कमी होते. डायबिटीसचे रूग्ण अनेकदा फळं खाण्याबाबत कन्फ्यूज असतात. फळांमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे काही हेल्थ एक्सपर्ट त्यांना फळं खाण्याचा सल्ला देतात. पण काही फळांमध्ये नॅचरल शुगर हाय असते. अशात ही फळं खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल हाय होण्याचा धोका असतो.

याबाबत डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी अशा काही फळांबाबत माहिती दिली आहे, ज्यामध्ये शुगर जास्त असते. डायटिशियन सांगतात की, ही फळं डायबिटीसचे रूग्ण खाऊ तर शकतात, पण या फळांचा ज्यूस कधीही पिऊ नये. 

डायबिटीसच्या रूग्णांनी कोणत्या फळांचा ज्यूस टाळावा?

डायटिशियन शिल्पा सांगतात की, डायबिटीसच्या रूग्णांनी संत्र्याचा ज्यूस कधीही पिऊ नये. संत्री अशीच खावीत. कारण यातून शरीराला फायबर मिळतं. जर याचा ज्यूस प्याल तर फायबर मिळणार नाही. 

दुसरं फळ आहे अननस. एक्सपर्ट सांगतात की, अननसाच्या ज्यूसमध्ये शुगर भरपूर असते. त्यामुळे हे फळ तुकडे करून जेवणासोबत खाल्ले पाहिजेत. त्यामुळे पचनही चांगलं होतं. याचा ज्यूस प्याल तर नुकसानच होईल.

आणखी एक फळ म्हणजे सफरचंद. डायबिटीसच्या रूग्णांनी याचा ज्यूस कधीही पिऊ नये. कारण याच्या ज्यूसमध्ये अधिक शुगर असते. सफरचंद असंच खाल तर अधिक फायदे मिळू शकतात.

कशाचा ज्यूस फायदेशीर?

आल्याचा ज्यूस डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो. हा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असत. तसेच हळद टाकून दुधी भोपळ्याचा ज्यूसही खूप फायदेशीर ठरतो. काकडी, पुदिना आणि कढीपत्त्याचा मिक्स ज्यूसही आरोग्यासाठी चांगला मानला जातो.

Web Title: Dietitian tells these 3 fruit juices that are bad in diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.